======================================
======================================
सांगली : वार्ताहर दि. २९ जुलै २०२३
सांगली : चोरी , घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक केली.
राकेश शिवलिंग हदीमणी वय २४ रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली. असे
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यानी स्था. गु. अ. शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास घर फोडी गुन्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवुन तसेच त्यांची सखोल माहिती काढुन त्यांच्या संशयीत हालचाली आढळुन आल्यास त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोहेकॉ मच्छिंद्र बर्डे , पोकॉ अजय बेंदरे यांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या आधारे सपोनि पकंज पवार, पोउपनि कुमार पाटील यांचे पथकाने शांतीबन चौक, धामणी रोड, सांगली येथे छापा मारत रेकॉर्डवरील आरोपी राकेश शिवलिंग हदीमणी वय २४ रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने , १२५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व १४,००० /- रुपये रोख असा एकूण ३,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. या अनुशंगाने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने विश्रामबाग व कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत रात्रीचे वेळी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे व कुपवाड पोलीस ठाणे कडे केलेल्या चौकशीअंती सदर मुद्देमाला बाबत विश्रामबाग पोलीस ठाणे कडे फिर्याद दाखल असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर आरोपीला पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती स्था. गु. अ. शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
आरोपी राकेश शिवलिंग हदीमणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरूध्द यापुर्वी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे सपोनि पंकज पवार, सपोनि सिंकदर वर्धन, पोउपनि कुमार पाटील , पोहेकॉ मच्छिंद्र बर्डे , पोहेकॉ बिरोबा नरळे , पोहेकॉ संदीप गुरव , पोहेकॉ संकेत मगदुम , पोहेकॉ दरीबा बंडगर , पोहेकॉ संजय कांबळे , पोहेकॉ नागेश कांबळे , पोना सुनिल जाधव , पोकॉ अजय बेंदरे , पोकॉ रोहन घस्ते , पोकॉ विनायक सुतार , पोकॉ अभिजीत ठाणेकर, पोकॉ सोमनाथ पंतगे , पोकॉ कॅप्टन गुंडवाडे सायबर पो. ठाणे मपोहेकॉ शुभांगी मुळीक , मपोहेकॉ सुनिता शेजाळे यांनी केली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆