फकीर कुटुंबियांनी ठेवले समाजासमोर आदर्श उदाहरण कुटुंब प्रमुख मुबारक फकीर यांच्या 90 व्या वाढदिवशी पर्यावरण संतुलनासाठी केले 90 देशी वृक्षांचे रोपण..
======================================
भिलवडी : वार्ताहर दि. १३ जुलै २०२३
भिलवडी : आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केप कापून, तो चेहऱ्याला फासून, फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते. मात्र भिलवडी (साखरवाडी) ता.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्बुबखर फकीर यांचे आजोबा व ग्रामपंचायत सदस्या रेहना फकीर यांचे आजे सासरे श्री मुबारक फकीर यांचा 90 वा वाढदिवस फकीर कुटुंबियांच्या वतीने मोठ्या उत्साहात ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच , सदस्य , गावातील प्रमुख नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या हस्ते 90 झाडे लावून साजरा करण्यात आला.
फकीर कुटुंबियांची समाजाप्रति कार्य करण्याची प्रेरणा , समाजाबद्दलची आत्मीयता, समाज सुधारण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या पिढीचे आदर्श दर्शन घडले.
सरपंच सौ.विद्या पाटील उपसरपंच पृथ्वीराज पाटील व ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी यांनी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुबारक फकीर यांना उदंड आयुषासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाल , श्रीफळ व गुलाब पुष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित सर्व मान्यवरांनी मुबारक फकीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच या अनोख्या उपक्रमाबद्दल फकीर कुटुंबीयांचे सर्वांनी कौतुक देखील केले.
यावेळी भिलवडी ग्रामपंचायत चे सरपंच सौ. विद्या पाटील , उपसरपंच पृथ्वीराज पाटील , भिलवडी गावचे प्रमुख नेते व जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम दादा पाटील , ग्रामपंचायतचे माजी सरपंच शहाजी गुरव , तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते , सांगली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बी डी पाटील , दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते , ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे , ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील , तलाठी महासंघाचे कार्याध्यक्ष गौसमंहमद लांडगे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय संपतराव पाटील , ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी , व्यापारी संघटनेचे जावेद शेख , पांडुरंग टकले , ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत कांबळे , सौ.सीमा शेटे , रेहना फकीर , मुसा शेख , चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष दीपक पाटील , मारुती हराळे , जमादार साहेब यांच्या सह आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆