yuva MAharashtra भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी... सांगली, मिरज, किर्लोस्करवाडीसह अन्य स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी... सांगली, मिरज, किर्लोस्करवाडीसह अन्य स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त



======================================
======================================

सांगली : वार्ताहर              ०८ जुलै २०२३

सांगली : भरलेली रेल्वे उडवून देणार अशा आलेल्या धमकीच्या फोनच्या पार्श्र्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सांगली,मिरज किर्लोस्करवाडीसह अन्य रेल्वे स्थानकावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संबंधित संशयित  आरोपीच्या शोधार्थ पोलीसांचे पथक गोव्याला रवाना झाले आहे.अशी माहिती मिळाली आहे.


संपूर्ण भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी अज्ञाताने फोनवरून दिली आहे. त्यानंतर सर्वच रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळाला असून, त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या धमकीच्या पार्श्वभूमीवर मिरज जंक्शन, सांगली स्थानकावर रेल्वे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांसह संपूर्ण स्थानकाची कसून तपासणी सुरू आहे.


गुरुवारी रात्री अज्ञाताने कांजूर रेल्वे स्थानकात फोन केला होता. त्यावेळी त्याने "कल ९ बाजे की योजना है, पुरा ट्रेन पॅक होगा. इंशाल्लाह हम हमारे मनसुबे मुकम्मल होंगे." खुदा हाफिज. असे सांगितले. हा फोन आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत सर्वच रेल्वे स्थानकावरील बंदोबस्तात वाढ करण्याची तसेच संशयास्पद प्रवाशी ठिकाणे यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच नाईट ड्यूटी केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच सुट्टीवर असलेल्या सर्वांना तातडीने बोलावून घेण्यात आले आहे. मिरज जंक्शन आणि सांगली स्थानकांसह जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.


दरम्यान सागर मारुती मोलावडे नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या नावाचा शोध लागला आहे. तो उत्तर गोवा येथे असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी गोव्याला पाठवण्यात आले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆