======================================
======================================
सांगली : वार्ताहर दि. 20 जुलै 2023
सांगली व मिरज शहरातील दुकान फोडून दुकानातील माल लंपास करणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे.
या चोरट्यां कडून 79000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पकडण्यात आलेला आरोपी हा अल्पवयीन असून चोरी करणारा त्याचा साथीदार वसीम मेहबुब शेख (बालेखान) रा. रेवणी गल्ली मिरज हा फरार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यानी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली यांना जिल्हयातील उघडकीस न आलेले मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिलेल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्था. गु. अ.शाखेकडील पोलीसांचे एक पथक तयार करुन त्यांना सांगली जिल्हयातील उघडकीस न आणलेल्या मालमत्तेच्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
नमूद पथकाने सांगली जिल्हातील उघडकीस न आलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता पथकातील पोशि विक्रम खोत यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदाराने चोरी केलेल्या साहित्यासह चोरीच्या यामाहा मोटरसायकलवरून तो अल्पवयीन मुलगा जाणार असलेबाबत बातमी मिळाली.
मिळालेल्या बातमीच्या आधारे स्था.गु.अ.शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून त्यास पंचासमक्ष ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असणाऱ्या ट्रॅव्हल बॅगमध्ये रोख रक्कम सहा हजार रुपये , वेगवेगळ्या कंपनीचे स्पोर्ट्सचे चार नग शूज , वेगवेगळ्या कंपनीचे बॅडमिंटन रॅकेट , एक ट्रॅव्हल बॅग , वेगवेगळ्या कंपनीचे टी-शर्ट व जर्किन सहा नग यासह चोरी केलेली RX 135 मॉडेलची एक यामाहा मोटरसायकल असा एकूण 79000/- रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमालाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा साथीदार वसीम मेहबुब शेख (बालेखान) रा. रेवणी गल्ली मिरज असे दोघांनी मिळुन मिरज येथील स्पोर्टसचे दुकान फोडले तसेच सांगलीतील दोन ठिकाणी व चेतना पेट्रोल पंप येथे किराणा मालाचे दुकान फोडले असून दक्षिण शिवाजीनगर येथील एका अपार्टमेंट समोरून एक दुचाकी गाडी चोरी केली असल्याची त्यांने कबुली दिली आहे.
विद्याधर बबन खोत रा. गुलाब कॉलनी, चेतना पेट्रोल पंपासमोर सांगली यांनी चेतना पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या आपल्या किराणामालाच्या दुकानात दि. 10-07-2023 रोजी रात्री चोरी झाली असल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली होती. दि. 11-07-2023 रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर भा.द.वि.कलम 454,457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पकडण्यात आलेल्या अल्पवयीन बालकास पुढील तपास कामी जप्त मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक, तुषार पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु. अ. शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व पोहेकॉ बंडगर, पोहेकॉ मच्छिंद्र बर्डे, पोहेकॉ नागेश खरात, पोना प्रकाश पाटील, पोना सागर टिंगरे, पोना सोमनाथ गुंडे, पोकॉ विक्रम खोत, पोकॉ कॅप्टन गुंडवाडे, मपोहेकॉ शुंभागी मुळीक यांनी केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆