======================================
======================================
अंकलखोप : वार्ताहर दि.१५ जुलै २०२३
पलूस तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील लोकांनी उद्योगधंद्यासाठी तसेच गायरान मधील उदरनिर्वाहासाठी वापरत असलेली जमीन त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंकलखोप येथील स्मारक तात्काळ लोकार्पण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अंकलखोप येथे रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले व समाज कल्याण कार्यालय व महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अंकलखोपसह परिसरातील दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निळ्या झेंड्यासह तरुण युवकाने महामानवांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची गेली कित्येक वर्ष अवहेलना सुरू आहे सातत्याने स्मारक लोकार्पण झाले नसल्यामुळे पडझड होत आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातत्याने आंदोलन करून पडझड दुरुस्ती झाली आहे परंतु ठेकेदार मलई खाण्याचे प्रकार करत आहेत स्मारकांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्यात येणार आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडून पुतळ्याच्या चबुत्र्यासाठी लागणारा 29 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जात नाही यामुळे पुतळा उभारण्याचे काम रखडले आहे सातत्याने पाठपुरावा करूनही समाज कल्याण कार्यालय सांगली हे अंकलखोप स्मारकाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे तरी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन स्मारकाचे लोकार्पण व्हावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व दलित महासंघ यांच्या वतीने अंकलखोप येथे आंदोलन करून करण्यात आली आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तीरमारे, उपाध्यक्ष शितल मोरे,विस्तार अधिकारी खाडे साहेब,बांधकाम विभागाचे मोहन पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष सुशील वाघमारे,युवा उद्योजक रवी पाटील, आष्टा शहर सुधार समितीचे सुधीर दादा पाटील,अंकलखोप शाखाध्यक्ष रोहित वारे,अक्षय तिरमारे, दलित महासंघ पलूस तालुकाध्यक्ष वेभव कोले, उपाध्यक्ष अमित वारे,रपेश वारे,सुधीर वारे,दर्शन वारे,अरुण वारे,अमोल वारे,दिगंबर वाघमारे,कुलदीप वारे यांच्यासह भर पावसामध्ये आंदोलनासाठी शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆