yuva MAharashtra पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे समाधान मेळाव्यात 948 प्रकरणांचा निपटारा ....तहसीलदार निवास ढाणे

पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे समाधान मेळाव्यात 948 प्रकरणांचा निपटारा ....तहसीलदार निवास ढाणे





======================================
======================================

पलूस : वार्ताहर                      दि. ५ऑगस्ट २०२३

पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत या करण्यात आलेल्या मेळाव्या मध्ये नागरिकांची 948 कामे मार्गी लागली अशी माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली यावेळी आमदार अरुण अण्णा लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, प्रांताधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार बबन करे, माजी सभापती दीपक मोहिते, गणपतराव सावंत, मिलिंद भैय्या पाटील, सरपंच सुमय्या कोल्हापुरे ,माजी सरपंच जयसिंग नावडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 यावेळी महसूल विभाग , पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग , वीज वितरण, एकात्मिक बाल विकास योजना ,परिवहन विभाग ,आरोग्य विभाग असे सर्व विभाग देखील   उपस्थित होते .यावेळी आमदार अरुण अण्णा लाड , महेंद्र आप्पा लाड ,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना तसेच नागरिकांना तात्काळ शिधावाटप संजय गांधी योजनेची मंजुरीची पत्र शपथपत्र  देण्यात आली. 



यावेळी सरपंच  सुमैया कोल्हापुरे यांनी आभार मानले, सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले. स्वागत तहसीलदार निवास ढाणे यांनी केले. यावेळी बोलताना तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, जिल्हाधिकारी मा डॉ राजा दयानिधी  यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाधान  मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. 


या मेळाव्यामध्ये महसूल विभागातील पुरवठा विषयक कामे, शिधापत्रिका ,दुबार शिधापत्रिका ,संजय गांधी योजना ,कृषी विभागातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म ठिबक योजना, प्रधानमंत्री पीक योजना, जमीन आरोग्य पत्रिका, रमाई आवास योजना ,दिव्यांग व्यक्तीस घरकुल योजना, नवीन गोठा बांधणी बाबत माहिती, मालमत्ता उतारे, जंतनाशक औषधे ,लंपी लसीकरण आणि वंध्यत्व तपासणी शिबिर व उपचार, नगरपालिका अंतर्गत जन्म प्रमाणपत्र ,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, परिवहन खात्यांतर्गत  एसटी महामंडळ योजनां चे मार्गदर्शन, वीज वितरण अंतर्गत नवीन कनेक्शन, अर्ज स्वीकारणे, बिल तक्रार अर्ज स्वीकारणे, भूमी अभिलेख खात्यातील ड्रोन सर्वेक्षण माहिती, सनद वाटप आरोग्य विभागांतर्गत रक्तातील साखर चेक करणे, रक्तदाब तपासणी, कृषी विभागांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री पीक योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना या संदर्भातील 948 कामांचा निपटारा  करण्यात आला. 



प्रांताधिकारी अजय शिंदे यांच्या उपस्थितीत व तहसीलदार निवास ढाणे यांच्या  नियोजनामुळे हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆