yuva MAharashtra डॉ.बाळासाहेब चोपडे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी

डॉ.बाळासाहेब चोपडे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी


======================================
==============================


भिलवडी : प्रतिनिधी                   दि. १२ऑगस्ट २०२३

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांनी अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संस्थेस एक लाख रुपयाची  देणगी दिली. देणगीचा धनादेश भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांचेकडे संपूर्द केला.

गेली अठ्ठावीस वर्षे सातत्याने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने  करीत असलेल्या रुग्णसेवेच्या  माध्यमातून डॉ.बाळासाहेब चोपडे परिचित आहेत.

संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी या देणगीचा उपयोग करण्यात यावा असे मनोगत यावेळी डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी व्यक्त केले.

या देणगी बद्दल विश्वास चितळे  यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब चोपडे यांचा सत्कार  करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक गिरीश चितळे,
डॉ.सुनील वाळवेकर यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆