yuva MAharashtra वसगडे येथे रेल्वे ट्रॅकजवळ आढळला एका अनोळखी महिलेचा मृतदेह..

वसगडे येथे रेल्वे ट्रॅकजवळ आढळला एका अनोळखी महिलेचा मृतदेह..



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                   दि.१७ ऑगस्ट २०२३

पलूस तालुक्यातील वसगडे येथे गावापासून काही आंतरावर असलेल्या रेल्वे - ट्रॅकवरील गेट क्र ११९ ते नांद्रे रेल्वे स्थानक दरम्यान वसगडे गावचे हद्दीत रूळापासून २० फुट अंतरावर मंगळवार दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळला.

मिरज-पुणे या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेची धडक झालेने सदर महिला हि जागेवर मयत झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
 भिलवडी पोलीस ठाण्याचे साहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अ.म.र.नं. २९/२०२३ सी.आर.पी.सी. १७४ नुसार भिलवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 पुढील तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.


             मयत महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे 

अंदाजे वय ६५ ते ७० वर्षे, बांधा सडपातळ, रंगाने गोरी उंची - ५ फुट २ इंच, केस काळे पांढरे, अंगात नेसणेस मोरपंखी रंगाची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज.



                भिलवडी पोलिसांचे आवाहन

 सदर मयत महिलेचे नातेवाईक मिळुन आलेस ओळख पटविण्याकरीता  पोलीस ठाणेस खालील फोन नंबरवर संपर्क साधावा

भिलवडी पोलीस ठाणे फोन नंबर- ९८९२७८४४२९, ९६८९६५९००२, ०२३४६-२३७२३३.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆