=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. १९ ऑगस्ट २०२३
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व भिलवडी येथील नामांकित हॉटेल ग्रिनपार्कचे मालक तसेच व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांचे वडील मारुती तुकाराम पाटील यांचे शुक्रवार दि.१८/०८/२०२३ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी भिलवडी ता.पलूस येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली सुना नातवंडे असा परीवार आहे.
त्यांना सर्वत्र आण्णा या टोपण नावाने ओळखले जात होते.
रमेश पाटील यांना घडवण्यात आण्णांचा सिंहाचा वाटा होता. आण्णांच्या निधनाने रमेश पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रक्षाविसर्जन ------रविवार दि. २० / ०८ / २०२३ रोजीसकाळी ८:३० वाजताकृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆