======================================
भिलवडी : प्रतिनिधी दि. 26 ऑगस्ट 2023
आण्णासाहेब पाटिल महामंडळाचा लाभ सहकारी सोसायट्या मार्फत तरुण शेतकर्यांना द्या अशी मागणी धनगांव जय हनुमान सोसायटिच्या वतीने नरेंद्र पाटिल यांच्याकडे करण्यात आली यावर जिल्हा बॅंकांशी बोलुन निर्णय घेऊ असे अश्वासन पाटिल यांनी दिले.
आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटिल यांची जय हनुमान सोसायटिचे चेरमन दिपक भोसले दत्ता उतळे अभिजीत साळुंखे अमित साळुंखे विकास साळुंखे यांनी भेट घेतली.
आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक व्यवसायिक बनवण्याचे काम नरेंद्र पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनंदनीय काम राज्यभरात सुरु आहे. आज या योजनेच्या यशाबद्दल पाटिल साहेब यांना भेटुन त्यांचे जय हनुमान सोसायटि धनगांव व जय हनुमान कृषी पुरक व प्रक्रिया संस्था धनगांव यांच्यावतीने अभिनंदन केले.
मराठा समाजातील तरुण अल्पभुधारक शेतकरी शेती आणि शेतीपुरक व्यवसायामध्ये नवनविन प्रयोग करत आहे. बहुतांष अल्पभुधारक शेतकरीच सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. जिल्हा बॅंकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो पण आण्णासाहेब पाटिल महामंडळासारख्या योजनांचा लाभ या अल्पभुधारक शेतकर्यांना मिळताना दिसत नाहि. या शेतकर्यांना गांवोगांवच्या सोसायट्या मार्फत आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन शेती आणि शेतीवर आधारीत उद्योग उभारण्यासाठि मदत करावी अशी मागणी केली. यावेळी जय हनुमान सोसायटिचे चेरमन दिपक भोसले अभिजीत साळुंखे विकास साळुंखे अमित साळुंखे भाजपचे तालुकाध्यक्ष विजय पाटिल आदिसह मान्यवर उपस्थित होते.
आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटिल यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष विजय पाटिल उपाध्यक्ष दिपक भोसले दत्ता उतळे अभिजीत साळुंखे अमित साळुंखे विकास साळुंखे आदि.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆