=====================================
=====================================
धाराशिव | वार्ताहर दि.३० ऑगस्ट २०२३
धाराशिव जिल्हयात गेल्या एक महिण्यापासुन पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी संकटाच्या कचाटयात सापडला होता यामुळे ह्या वर्षी शेतकऱ्यांने कर्ज काढुन पेरण्या केल्या होत्या परंतु अद्याप पर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील 70 टक्के पिके संपुष्टात आलेली आहेत. यामुळे शेतकरी शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसाणीत सापडला आहे.
तरी धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहिर करून हेक्टरी अनुदान रूपी मदत जाहिर करावी तसेच शेतकऱ्यांना अग्रमी विमा तात्काळ देऊन शेतकऱ्यांना देण्या यावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन छावा क्रांतिवरी सेनेच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष विष्णु भोसले आय टी सेलचे शैलेश लोखंडे, अनंत भोसले, संतोष भोसले, शुभम भोसले, महादेव कोळी आदीच्या सह्या आहेत.
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆