=====================================
=====================================
सांगली- वार्ताहर दि. 29 ऑगस्ट 2023
सांगली : भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा सरचिटणीस व वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन चे सांगली जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून जपली माणूसकी..
वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे असे आजच्या तरुणाईंचे समीकरणच बनलेले असते. मात्र, या सर्व अनावश्यक गोष्टींना फाटा देत सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी ,वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना खाऊ वाटप , दिव्यांग व गोरगरीब गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार
कुपवाड ता.मिरज येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना खाऊ वाटप , सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मयत झालेले कै.संदीप बावीमणी यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप , तसेच दिव्यांग व्यक्तींना मोफत दिव्यांग रजिस्ट्रेशन करून देऊन सामाजिक बांधीलकी जपत सांगली-कुपवाड येथील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.
यावेळी बोलताना संजय कांबळे म्हणाले की, जीवनात अनेक लोकांना एक वेळचा आनंद देखील भेटत नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझे तरुणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालय, दुष्काळग्रस्त, शेतकरी, शाळा, अंध, दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणेकरून सामाजिक भान जपण्याचे महान कार्य आपल्या हातून घडेल.
सध्या सगळीकडेच चौका-चौकात तरुण मुलं आपल्या मित्राचा वाढदिवस महागड्या किंमतीचा केक कापून व डिजे ,बँडबाज्या व फटाक्यांची आतिषबाजी करुन साजरा करताना दिसतात. यामध्ये हाजारों रुपयांचा अनावश्यक खर्च केला जातो. ऐवढेच नव्हे तर केक कापून तोंडाला फासतात. यामध्ये एकच गोष्ट होती ती म्हणजे अन्नाची नासाडी.
संजय कांबळे यांनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरीब रुग्णांना गरजूंना मदत करण्याचे ठरवले. आणि सामाजिक भान जपण्यांचे काम केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेशजी तामगावकर, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे, कार्यालयीन सचिव विकास कांबळे, पर्यटन सचिव रतन तोडकर, वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, विनोद साबळे, सचिन कांबळे, दीपक कांबळे, नंदा बावीमनी, सुरेखा भावीमणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆