=====================================
=====================================
सांगली : वार्ताहर दि. 03 ऑगस्ट 2023
महापालिका सेवा (ड्युटी) संपवून घरी परतत असताना रस्त्यामध्येच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने जागीच मृत्यूमुखी झालेला कर्मचारी "नितीन युवराज सरोदे" यांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून पाच लाख रुपये द्यावे तसेच त्यांच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करा.
संजय कांबळे जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची मागणी.
आदरणीय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनात काम करीत असणारे कर्मचारी नितीन युवराज सरोदे हे आपले कर्तव्य पार पाडून घरी परततांना हृदय विकाराचा तीव्र झटक्याने वाटेतच त्यांचे निधन झाले आहे. यामुळे मा.आयुक्तसो,मनपा यांना प्रत्येक्षात भेटून सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत येणारे ड्रेनेज शाखेतील मिरज कार्यालय येथे मानधन तत्त्वावर मदतनीस म्हणून काम करत असणारे कर्मचारी नितीन युवराज सरोदे हे आपले कर्तव्य प्रमाणिक पणे पार पाडून सुट्टी झाल्यावर आपल्या घरी परतताना दि.३०/०७/२०२३ रविवार रोजी रात्री सर्वसाधारण अंदाजे १२.३० च्या दरम्यान विजयनगर येथील रेल्वे पुला नजीक आल्यावर हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,लहान मुलगी आणि वृद्ध आई वडील आहेत. नितीन युवराज सरोदे यांची दिनांक २१/११/२०१० रोजी, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्थलसिमेतील विद्युत दिव्यांची देखभाल व दुरुस्ती मनपा अंतर्गत करणेसाठी आवश्यक असणारा वायरमन व हेल्पर कर्मचारी वर्ग मानधन तत्वावर काम करण्यासाठी ठरावान्वे नियुक्ती करण्यासाठी मान्यता दिली आहे.कायदेशीर ठराव होऊन नियुक्ती करण्यात आलेल्या मंजूर यादी मध्ये नितीन युवराज सरोदे यांचे अनुक्रमणिका १८ वर नावाची नोंद आहे. त्या नियुक्ती पासून दिनांक ११/०४/२०२३ चे मा. उपायुक्तसो यांचे आदेशानुसार मिरज जलनि:सारण ड्रेनेज पंपींग स्टेशनवर हेल्पर म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या महापालिका प्रशासन सेवेतील जवळपास १२ ते १५ वर्षे आपले कर्तव्य प्रमाणिक पणे पार पाडत होते. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व बिकट स्वरूपाची असून घरचा कर्ता पुरूष म्हणुन मुख्य कमविणारी व्यक्ती होती तसेच एन तारुण्यात मृत्यूमुखी पडल्याने संपुर्ण कुटुंबाचा आधार हरपले आहे. ही पोकळी पैशाने भरून येणारे नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे महापालिका प्रशासनाचे पालक व सामाजिक जबाबदारी या नात्याने मयत कर्मचारी नितिन सरोदे यांच्या कुटुंबीयांची काळजी व मानसिक आधार म्हणून त्यांच्या कायदेशीर वारसांना तातडीची मदत म्हणून पाच लाख रुपये आर्थिक मदत देऊन त्यांची मुलगी लहान असल्यामुळे त्यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे.तसेच भविष्यात असे दु:खद घटना घडू नयेत म्हणून आपण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कार्यरत कर्मचारी यांचे किमान महिन्यातून एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर महापालिका प्रशासनाच्या खर्चाने मोफत औषध उपचार करण्यात यावा.असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
निवेदनाची प्रत मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो सांगली जिल्हा यांना देण्यात आली आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मोहन साबळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेशजी तामगांवकर, जितेंद्र कोलप, विशाल कांबळे, रतन तोडकर, आनंदराव कांबळे, रविंद्र कांबळे, सचिन कोलप, महेंद्र कांबळे यांच्या बरोबर बहुसंख्येने कामगार कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆