yuva MAharashtra पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळांत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा ; डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची विशेष उपस्थिती , विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळांत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा ; डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची विशेष उपस्थिती , विद्यार्थ्यांशी साधला संवाद



=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर     दि. ३० ऑगस्ट २०२३

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक ,शाळा नंबर दोन,  शाळा नंबर तीन मध्ये संयुक्तरित्या राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

 यावेळी " नामांकित राष्ट्रीय खेळाडूचा विद्यार्थ्यांशी संवाद " हा उपक्रम पार पडला. सांगली जिल्ह्यातले खानापूर तालुक्यातील भाळवणी गावचे सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून महाराष्ट्रातील व देशातील नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची पोस्टर्स हातात धरून सर्व खेळाडूंना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते माजी प्राचार्य सुहास निकम होते. प्रारंभी पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण यांचे हस्ते पैलवान चंद्रहार पाटील यांना शाल, बुके आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. 



यावेळी बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की मानवी आयुष्यात खेळाला अनन्य साधारण महत्व असून कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात सातत्य ठेवायला हवे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे अधिक लक्ष द्यावे व शरीर काटक बनवावे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार नितीन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास संभाजी पाटील, वंदना सनगर ,अनिल कणसे, प्रकाश शिंदे, जगन्नाथ शिंदे ,शैलजा लाड, वनिता कांबळे,संगीता पाटील, स्मिता लाड, विशाखा ढेरे,कविता कांबळे,सुनिता पवार,अजय काकडे,सिराज सुतार,विनोद आल्हाट,वर्षाराणी हैदरे शारदा पवार यांचे सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                               👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆