पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सांगली येथे पुरस्कार प्रदान
=====================================
=====================================
पलूस : वार्ताहर दि. ०२ ऑगस्ट २०२३
पलूस तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार निवास ढाणे यांना सांगली येथे आज महसूल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरवण्यात आले.हा सन्मान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व महसूल अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीत खूप चांगली सेवा पलूस तालुक्यातील नागरिकांना दिली आहे. त्यामधील प्रामुख्याने कोरोना कालावधीत केलेली सेवा तसेच 2021 मध्ये आलेला महापूर आणि दैनंदिन कामकाजाचा असणारा त्यांचा निपटारा या त्यांच्या असणाऱ्या सर्व कामाचा लौकिक म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये पलूस चे तहसिलदार निवास ढाणे यांना आदर्श तहसिलदार म्हणून गौरवण्यात आले.
पलूस चे मंडल अधिकारी तानाजी पवार यांनाही मंडल अधिकारी सेवेत असणारा उत्कृष्ट पुरस्कार देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच महसूल अव्वल कारकुन हेमा साबळे यांनाही उत्कृष्ट कारकुनचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆