======================================
======================================
कडेगाव : प्रतिनिधी दि. ०२ ऑगस्ट २०२३
शरद फाउंडेशन माध्यमातून देशाला रक्ताच्या तुटवड्यातून बाहेर काढण्याची शपथ आम्ही घेतली आहे यासाठी दर महिन्याला पलूस आणि कडेगाव तालुक्यात सतत वर्षभर रक्तदान शिबिर घेतली जात आहेत, यातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल असे प्रतिपादन क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.
ते कडेगाव येथे शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस-कडेगाव तसेच कडेगाव शहर यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी लाड म्हणाले, दोन्ही तालुक्यात कोणत्याही व्यक्तीला लागेल तेव्हा या शरद फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी डी. एस. देशमुख, जयदीप यादव, महेंद्र करांडे, सुरेश शिंगटे, विराज पवार, वैभव देसाई, नगरसेवक संदीप काटकर, माऊली देशमुख, सागर लाटोरे, अतुल नांगरे, किरण चव्हाण, विशाल जाधव, सोमनाथ वायदंडे, रमेश जाधव, शाहिद पटेल, संभाजी पाटील, सोमनाथ घार्गे,सिकंदर मुल्ला, श्रीकांत थोरात, शाहरुख पटेल, राहुल जाधव, युवराज देसाई, युवराज जरग, प्रविण करडे, किरण कुराडे, अभिमन्यू वरुडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगाव येथे शरद फाउंडेशन मार्फत रक्तदानाचा शुभारंभ करताना शरद लाड,आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆