yuva MAharashtra जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवैध धंदे त्वरित बंद करा , अन्यथा तीव्र आंदोलन... वंचित बहुजन आघाडीचे , उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन...

जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवैध धंदे त्वरित बंद करा , अन्यथा तीव्र आंदोलन... वंचित बहुजन आघाडीचे , उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन...





=====================================
=====================================

जत : वार्ताहर                  दि. ३० ऑगस्ट २०२३

जत : जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील बोकाळलेले अवैध धंदे, त्वरित बंद करुन संबधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा कमिटीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

  दुष्काळाने त्रस्त असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. परंतु या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंद्यामध्ये गुरफटलेल्या लोकांचे परिवार बरबाद होत आहेत.  जे लोक अवैध धंदे चालवतात त्यांना मात्र  मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे व नुकसान मात्र  सामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना होत आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
 जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील बोकाळलेले अवैध धंदे त्वरित बंद करुन संबधितावर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


   यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजू मुलानी, संजय कांबळे, विठ्ठल पुजारी, अनिल पवार, स्वप्नील खांडेकर आदी उपस्थित होते.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                                 👇
 

  
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆