=====================================
पलूस : वार्ताहर दि. ०३ ऑगस्ट २०२३
नवपरीवर्तन समाज संघटनेच्या वतीने पलूस तालुक्यातील बुर्ली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे यांचे मुळ गाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथून नवपरीवर्तन समाज संघटनेच्या वतीने ज्योत आणण्यात आली. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व थोर महापुरुषांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जयंती निमित्त अन्नदान करण्यात आले. आणि रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆