yuva MAharashtra संतांची शिकवण समाजाला दिशा देणारी असुन त्याचे आचरण सर्व समाजाने करावे तरच समाज योग्य दिशेने जाईल ....ह.भ.प.शामसुंदर सोन्नर

संतांची शिकवण समाजाला दिशा देणारी असुन त्याचे आचरण सर्व समाजाने करावे तरच समाज योग्य दिशेने जाईल ....ह.भ.प.शामसुंदर सोन्नर



======================================
======================================

कुंडल : वार्ताहर                         दि. 31 ऑगस्ट 2023

संतांची शिकवण समाजाला दिशा देणारी असुन त्याचे आचरण सर्व समाजाने करावे तरच समाज योग्य दिशेने जाईल असे मत ह.भ.प.शामसुंदर सोन्नर यांनी व्यक्त केले.

      कुंडल तालुका पलूस येथे क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड महाविद्यालय कुंडल यांनी आयोजित केलेल्या क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी आमदार अरुण लाड, क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, व्ही वाय पाटील ,प्राचार्य मेजर आर एस डबल प्रमुख उपस्थित होते.
           
       ह भ प शामसुंदर सोन्नर पुढे म्हणाले की सत्य भाषेत व मवाळ भाषेत विचार मांडले पाहिजेत, वक्तृत्व ही कला आहे त्याचा योग्य वापर करा ,तुमच्या वक्तृत्वचा चुकीचा वापर करुन समाजाची दिशाभूल केली जात आहे त्या पासुन सावध रहा,जाती वरुन कोनाचा द्वेष करु नका, सत्य विरुद्ध असत्य या धर्म युद्धा विरुध्द लढत रहा.

       आमदार.अरुण लाड म्हणाले कि..या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड यांचे विचार चांदा ते बांदा पर्यंत पोहोचवण्याचा वसा आपन विद्यार्थ्यांनी घ्यावा आई बाप आपल्या जीवनातील मुख्य घटक आहेत त्यांच्या विचारांचा वसा तुम्हाला घडवत राहील संतांची शिकवण आपल्याला पुढे घेवुन  जाईल किलो ने सोने दान दिले जाते मात्र गोरगरिबांच्या साठी कोणी काही देत नाही दुलीतांचे तिमिर जावो ही संतांची शिकवण बाजूला ठेवल्याने समाज बिघडायला लागला आहे. असे ते शेवटी म्हणाले.
    या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष शरद लाड म्हणाले की युवा व्याख्तात्यांना आपले‌ मनातील विचार मांडता यावे त्यांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा तसेच क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड यांचे विचार सर्व दूर पोहोचावे या उद्देशाने यार क्रांतीअग्रणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे आजपर्यंत ही स्पर्धा  नी पक्षपातीपणे पार पडली आहे इथून पुढेही या स्पर्धेचे परीक्षक यांनी कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल घेत नी पक्षपातीपणाने स्पर्धेचा निकाल जाहीर करावा या स्पर्धेसाठी चांदा ते बांदा पासून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल खूप समाधान वाटत आहे असे ते शेवटी म्हणाले.


      या उदघाटन सोहळ्यास गांधी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी एल रोकडे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विभुते ,दिलीप थोरबोले अनिल पवार सत्येश्वर  पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन अशोक पवार, उमेश पेटकर ,  वैष्णवी जंगम,भारती सुतार.तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य मेजर आर एस डबल यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक प्रताप लाड यांनी करून दिली
    या कार्यक्रमाचे आभार.प्रा.धनंजय होनमाने यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश खारगे यांनी केले.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                           👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆