======================================
======================================
पलूस : वार्ताहर दि. १७ सप्टेंबर २०२४
पुणे पदवीधर आमदार, मा.श्री. अरुण (अण्णा)लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा. श्री. शरद (भाऊ)लाड यांच्या संकल्पनेतून
मा. सौ. धनश्री शरद लाड यांचे अध्यक्षतेखाली शरद फाउंडेशन कुंडल, संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस - कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांचे संयुक्त विद्यमाने रामानंदनगर, बुर्ली, सावंतपूर, नागराळे या भागातील विद्यार्थी, तरुण, तरुणी, वयोवृद्ध लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर शनिवार 16/09/2023 रोजी रामानंदनगर ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी पार पडले.
या शिबिराचे उदघाट्न पद आमदार मा. श्री. अरुण (अण्णा) लाड यांनी केले. तसेच आजपर्यंत क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी समाज सेवेचा वसा आम्हाला दिला आहे तोच वारसा आम्ही अशा प्रकारच्या समाजोपयोगी, लोक कल्याणकारी योजना यापुढेही शरद आत्मनिर्भर अभियानामार्फत राबवू असे प्रतिपादन केले. तसेच या शिबिराचा लाभ समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन केले.
शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव तथा क्रांती महिला प्रतिष्ठान पलूस - कडेगाव च्या अध्यक्षा धनश्री शरद लाड यांनी या शिबिरास भेट देऊन आलेल्या सर्व पेशंटची आपुलकीने चौकशी करून शिबिराचा लाभ घेणेबाबत आवाहन करून श्री. टेके आय क्लिनिक मधील सर्व डॉक्टर व त्यांची टीम यांचेही आभार मानले.
या शिबिरासाठी प्रामुख्याने ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. आबा पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष दिपक मदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस तालुका कार्याध्यक्ष विनायक महाडिक, युवक राष्ट्रवादी पलुस तालुका अध्यक्ष इंद्रजित पवार, रामानंद नगरच्या माजी सरपंच सौ जयश्री दीपक मदने, विशाल जाधव, इम्तियाज मुल्ला, श्रीधर जाधव, चंद्रकांत सुळे, निवृत्ती पाटील,संपतराव सावंत, भरत घाडगे, मोहित यशवंत, संकेत सावंत, नितीन पवार, विजय पाटील, पांडुरंग हजारे, बी सी पाटील सर, राहुल पाटील, विकास जाधव, , कीर्ती शिंदे, मानसी रकटे, मीनाक्षी मदने, निर्मला वाटकर इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆