yuva MAharashtra The JanShakti News

No title



=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर                           दि. 18 सप्टेंबर 2023

क्रांती कारखान्याला देशातील सर्वोकृष्ट सहवीज निर्मितीचा  द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आणि त्यांच्या शिष्ठमंडळाने स्वीकारला.

को-जनरेशन असोसीयेषण ऑफ इंडिया कडून देश पातळीवर सहवीज निर्मिती करणाऱ्या संस्थांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम केले जाते. या संस्थेकडून ज्या संस्थांकडून सहवीज निर्मिती केली जाते त्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी क्रांती कारखान्याने मागील तीन वर्षात पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती केली आहे. वाफेचा कार्यक्षम वापर केला आहे.सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने प्रकल्प चालवला व जास्तीत जास्त वीज निर्यात ही केली आहे. कारखान्याला स्वतःसाठी कमीतकमी विजेचा वावर केला आहे. वीज निर्मितीसाठी पाण्याची ही बचत करून त्याचा पुनर्वापर ही केला आहे. प्रशिक्षित कर्मचार्यांकडून प्रकल्प चालवला जातो. बॉयलर मधून निघणाऱ्या कार्बनने पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून अत्याधुनिकीकरन केले आहे. यासर्वांसाठी अत्त्युच्य सुरक्षा ही सांभाळली जाते हे सर्व करून कमीत कमी खर्चात वीज निर्मिती केली जाते या सर्व निकषांचा विचार करून हा पुरस्कार दिला गेला आहे.

हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, दिलीप थोरबोले, वैभव पवार, संग्राम जाधव, सुभाष वडेर, जितेंद्र पाटील, सुकुमार पाटील, अशोक विभूते कर्मचारी यांनी स्वीकारला.


पुणे येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांतील सहवीज निर्मितीचा देशातील सर्वोकृष्ट सहवीज निर्मितीतिल द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारताना शरद लाड आणि संचालक, कर्मचारी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆