पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचा अनोखा उपक्रम
============================================================================
भिलवडी : वार्ताहर दि. 2 सप्टेंबर 2023
भिलवडी (ता.पलूस) येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने याही वर्षी श्रींची मूर्ती घरीच विसर्जन करा व सुंदर पुस्तक भेट मिळवा या विशेष उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे. उपक्रमाबाबत अधिक माहिती श्री.कवडे यांनी दिली
संस्कार केंद्राचे वतीने पर्यावरण रक्षणासाठी विविध सणांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते व पर्यावरण पूरक सन साजरे केले जातात.
नदीचे प्रदूषण टाळणेसाठी गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच करून त्याचा फोटो ९६६५२२१८२२ या व्हाटसअप नंबर वरती पाठवावा या उप्रकमात सहभागी होण्यासाठी श्री.बाळासाहेब माने सर व हणमंतराव डिसले यांचे कडे नाव नोदणी करावी या उपक्रमातील सर्व सहभागी भक्तांना मान्यवरांच्या हस्ते एका विशेष समारंभात सुंदर व संस्कारक्षम पुस्तक भेट देऊन गौरविण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी श्री सुभाष कवडे केंद्रप्रमुख साने गुरुजी संस्कार केंद्र यांचेशी संपर्क साधावा भिलवडी आणि परिसरातील सर्व गणेश भक्तांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे उपक्रमाचे हे ४ थे वर्ष आहे
संस्कार केंद्राचे वतीने गणेश विसर्जनादिवशी कृष्णा नदीकाठावर भिलवडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात येणार आहे सर्व गणेश भक्तांनी निर्माल्य नदीत विसर्जित न करता संक्सार केंद्र व ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या निर्माल्य कलशामध्ये विसर्जित करावे निर्माल्य संकलन उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे दोन्ही उपक्रमात गणेश भक्तांनी सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने करण्यात आलेले आहे.
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆