=====================================
कुंडल : वार्ताहर दि. 6 सप्टेंबर 2023
शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल आमदार अरुणअण्णा लाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार केरळ येथील थीरूअनंतपुरम येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्स्पो मध्ये उत्तरप्रदेशचे माजी अन्न औषध प्रशासनचे कमिशनर डॉ.संजय भूषरेड्डी यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी संजीव चोप्रा, व्हिएसआयचे संभाजी कडूपाटील, समीर सोमैया, रणजित पुरी, इस्माचे अध्यक्ष आदित्य झुनझुननवाला यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी देश पातळीवरून निवडण यादी करण्यात आली होती. सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कमी कालावधीत गाळप क्षमता वाढविणे, सहवीज प्रकल्पातून वीज तुटवडा या राष्ट्रीय संकटात मदत करणे, इथेनॉल सारख्या उपपदार्थातून कारखान्याची आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची उन्नती साधने, हे सगळं करताना पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 70 हजार वृक्ष लागवड व संवर्धन करून पर्यावरण संवर्धन करणे, ऊस विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणे आणि यातून देशातील सर्वोक्तृष्ट साखर कारखाना म्हणून नावलौकिक मिळवणे या बाबींचा विचार करून हा पुरस्कार देणेत आला. कारखाना प्रगती पथावर नेनेसाठी अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या उक्तृष्ठ नियोजनामुळेच शक्य झाल्याने त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमदार अरुणअण्णा लाड आणि पत्नी प्रमिलाताई लाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. संजय भुसरेड्डी आणि मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆