======================================
वाळवा : वार्ताहर दि. 4 सप्टेंबर 2023
तानुबाई नारायण वायदंडे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृध्दापकाळाने पोखर्णी ता.वाळवा जि.सांगली येथे राहत्या घरी सोमवार दिनांक ४/९/२०२३ रोजी दु:खद निधन झाले.
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जमीन झोपडी हक्क अभियान राज्यप्रमुख ( जहाल ) नेते मा.अशोकराव वायदंडे यांच्या त्या मातोश्री होत.
आज सकाळी पोखर्णी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अशोकराव वायदंडे यांचा आप्तपरीवार व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाविसर्जन व कार्य विधी ---बुधवार दिनांक ६/९/२०२३ रोजीसकाळी - ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरी पोखर्णी ता. वाळवा जि. सांगली या ठिकाणी होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆