yuva MAharashtra सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी

सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी



======================================
======================================

सांगली : वार्ताहर                   दि. ५ सप्टेंबर २०२३

सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलांचा जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी छ. शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी २१ जिल्हा व पुण्यातील क्लब अशा संघांत इन्व्हिटेशन लीग स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत होणार आहेत. ह्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघासाठी संभाव्य खेळाडू म्हणून निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी तरुण व होतकरू खेळाडूंसाठी ही अतिशय नामी संधी असून, ह्या संधीचा जास्तीतजास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष मा. संजय बजाज यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे. 


१४ वर्षाखालील संघासाठी ज्या खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००९ नंतर झालेला आहे अशा इच्छूक खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात क्रिकेट साहित्यासह ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ : ०० वाजता छ. शिवाजी महाराज स्टेडियम येथे आधार कार्ड, जन्म दाखला, फॉर्म फी १०० रुपये व १ फोटो घेऊन चाचणीसाठी हजर राहावे.
--------------------------------------------------------------------
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                           👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆