yuva MAharashtra निधन वार्ता - भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवान , शंकर पांडुरंग वावरे यांचे दु:खद निधन

निधन वार्ता - भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवान , शंकर पांडुरंग वावरे यांचे दु:खद निधन



======================================
======================================



भिलवडी : वार्ताहर              दि. 11 ऑक्टोबर 2023

1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभागी असलेले  भारतीय लष्करातील मराठा रेजिमेंट चे सेवानिवृत्त जवान ना.सुभेदार शंकर पांडुरंग वावरे (अप्पा) यांचे आज बुधवार दि. 11 / 10 / 2023 रोजी  वयाच्या 81 व्या वर्षी माळवाडी (भिलवडी) ता.पलूस येथे हृदय विकाराने दुखत निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा ,सून ,नातवंडे असा परिवार आहे. 
आप्पांच्या जाण्यांने वावरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शंकर वावरे (आप्पा) हे भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे संचालक होते व त्यांनी संघटनेचे जेष्ठ सल्लागार म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे.




  अंत्यसंस्कारावेळी आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने भिलवडी व परिसरातील आजी-माजी सैनिकांनी त्यांना  रित अर्पण करुन  शंकर आप्पा अमर रहे.. अमर रहे.. अशा घोषणा देत भावनिक श्रद्धांजली वाहिली.


रक्षाविसर्जन व कार्य ---

शुक्रवार दि. 13/10/2023 रोजी  सकाळी 9:00 वाजता.
कृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆