yuva MAharashtra पुस्तके जगण्यासाठी सकारात्मक प्रेरणा देतात - शरद जाधव

पुस्तके जगण्यासाठी सकारात्मक प्रेरणा देतात - शरद जाधव







=====================================
=====================================

इस्लामपूर :  वार्ताहर                  दि. १२ ऑक्टोबर २०२३

  मनाची मशागत करण्यासाठी चांगल्या विचारांची,संस्काराची गरज आहे.त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोबाईल वरील वॉच टाईम कमी करा नि पुस्तकांशी मैत्री करा.पुस्तके जीवन जगण्यासाठी सकारात्मक दिशा व प्रेरणा देतात असे आवाहन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी व्यक्त केले.
श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित आदर्श बालकमंदिर अँड हायस्कूल व कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूर येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा पंधरवडा व पुस्तक प्रदर्शनानिमित आयोजित व्याखानात  ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आई वडील,मित्रमैत्रीणी,पालकांसोबत संवाद साधल्यास  मनामध्ये असलेली अभ्यास व परीक्षेची,अभ्यासाची भीती कमी होईल.वेळेचे नियोजन,सकारात्मक दृष्टी व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेल्यास हमखास यश मिळते.यावेळी शरद जाधव यांनी विविध प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.तसेच हास्य विनोदाच्या माध्यमातून खळखळून मनोरंजनही केले.


 जयकर जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.नलिनी आयरे यांनी आभार मानले.यावेळी आदर्श बालक मंदिरचे मुख्याध्यापक भास्कर जाधव,कमलाबाई रामनामे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गीता सावंत,पर्यवेक्षक अशोक गिरी,सौ.प्रेरणा देशपांडे आदींसह शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆