भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
======================================
======================================
भिलवडी : वार्ताहर दि. 15 ऑक्टोबर 2023
भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीने खास महिला पालकांसाठी आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत
सौ. विजया हणमंत पाटील या ठरल्या पैठणीच्या मानकरी.
उद्योजिका सौ.अनघा चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.रुपाली वाळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
खास आकर्षण
हास्ययात्राकार शरद जाधव यांच्या खुमासदार शैलीतील विनोद व संचलानाने कार्यक्रमात रंगत आणली.
विजेते स्पर्धक -
प्रथम - सौ. विजया हणमंत पाटील , द्वितीय - सौ.पूजा श्रीकांत चव्हाण ,
तृतीय - सौ.पूजा मोहन पाचुंदे , चतुर्थ - गीता गजानन निलजकर ,पाचवा - सौ.तेजस्विनी दत्तात्रय रामचंद्रे , सहावा - सौ.शोभा तुकाराम मान , सातवा - सौ. वर्षा महादेव वावरे या भगिनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या. या सर्व विजेत्या स्पर्धकांना व या पूर्वी नुकत्याच घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस सौजन्य
भिलवडी येथील काही व्यापाऱ्यांनी व माळवाडी येथील एका कला,क्रीडा व शिक्षण मंडळाच्या सौजन्याने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेसाठी वस्तू स्वरुपात बक्षिसे दिली होती तर पाककला स्पर्धेसाठी सर्व बक्षिसे भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां सौ.अर्चना सुकुमार किणीकर यांच्या सौजन्याने देण्यात आले होते.
या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कुशल व नेटके संयोजन
या दोन्ही स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे,पूजा गुरव,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे,करिश्मा शिकलगार,मेघना शेटे,मंजुषा मोरे,स्वाती भोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. व महिलांसाठी आयोजित विविध खेळांचे सूत्रसंचालन व संयोजन केले.
या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विद्या पाटील,भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील, भिलवडी ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा शेटे,सौ.रुपाली कांबळे,सौ.स्वप्नाली रांजणे, जायंटस सहेलीच्या उपाध्यक्षा सौ.स्मिता वाळवेकर,सौ.अर्चना किणीकर,सौ.प्रगती पाटील,सौ.प्रिया वाळवेकर,सौ.प्राजक्ता कुलकर्णी आदी मान्यवरांसह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सौ. संध्याराणी मोरे यांनी आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆