yuva MAharashtra रयत क्रांती पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी सुरज आबाचने यांची नियुक्ती ; मा. कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

रयत क्रांती पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी सुरज आबाचने यांची नियुक्ती ; मा. कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान



=====================================
=====================================

उमरगा : प्रतिनिधी                    दि. 6 ऑक्टोबर 2023

उमरगा : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमरगा चे सुरज आबाचने यांची नियुक्ती करण्यात आली या आशयाचे पत्र रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते देण्यात आले.

              पंढरपूर येथे राज्यव्यापी विस्तारित कार्यकारणी बैठकीत घोषणा करून ही निवड करण्यात आली.माजी मंत्री सदाभाऊ खोत व सागर खोत यांच्या उपस्थिती मध्ये पंढरपूर येथे संघटनेचे व पक्षाचे राज्यव्यापी विस्तारित कार्यकारणी बैठक आयोजित केली होती.
               यावेळी रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाच्या बैठकीस  रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे,माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव,शिक्षक आघाडीचे एन.डी.चौगुले सर, प्रदेश कार्याध्यक्ष व पक्षाचे प्रवक्ते दिपक भोसले व ऊस दर नियंत्रित समितीचे सदस्य प्रा.सुहास पाटील, रयत क्रांती संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष नामदेव माकोडे, आंगद शिंदे, यशवंत पाटील धाराशिव जिल्ह्यात 
 
 तसेच राज्यातील व अनेक जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहन आ.सदाभाऊ खोत यांनी सर्व पदाधिकारी यांना केले.या निवडीनंतर सुरज आबाचने यांनी आ.सदाभाऊ खोत व सागर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना व पक्ष मजबुत करून,  संघटनेत पक्षात ,शेतकरी,शेतमजुर,कामगर,विद्यार्थी व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆