yuva MAharashtra खेडमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर सापडले वादळात...

खेडमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर सापडले वादळात...





=====================================
=====================================

रत्नागिरी / खेड :                दि.18 ऑक्टोबर 2023

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सद्या कोकण दौऱ्यावर आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर ॲक्शन मूड वर आहेत. पडळकर यांचे हेलिकॉप्टर मंगळवारी दि.१७ रोजी सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये वादळात सापडले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने व सिंग्नल न मिळाल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर नियोजित वेळेत न उतरता तब्बल अर्धा तास हवेतच भरकटत राहिले. परंतु चालकाच्या समयसूचकतेमुळे हेलिकॉप्टर
नियोजित ठिकाणी सुखरूप लँड झाले.


भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांची खेड मधील भरणे येथे मंगळवारी दि.१७ रोजी धनगर जागर सभा होती. त्यासाठी आ. पडळकर हे हेलिकॉप्टरने खेडमध्ये येणार होते. मात्र नेमके हेलिकॉप्टर उतरण्याच्या वेळेत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी भरणे येथील हेलिपॅडवर पाडळकर यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास तब्बल अर्धातास विलंब झाला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४.१४ वाजता आ.पाडळकर यांच्यासह स्विय सचिव, अंगरक्षक यांना घेऊन धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना घेऊन उतरले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.


यावेळी आ.पडळकर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हणाले, कोकणातील धनगर समाज गेले सत्तर वर्ष संघर्ष करत असून पावसामुळे जरी आमचे हेलिकप्टर उतरण्यास विलंब झाला असला तरी आमच्या पाठीमागे लोकांचे आशिर्वाद आहेत. त्यामुळे आमचे हेलिकॉप्टर सुरक्षित उतरले. कोकणातील धनगर समजावर गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित, वंचित आहे. त्यामुळे कोकणातील बांधवांना भेटून त्यांना देखील राज्यातील समस्त धनगर समाजासोबत पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆