yuva MAharashtra तणावमुक्त जीवन ही यशाची पहिली पायरी आहे - प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे..

तणावमुक्त जीवन ही यशाची पहिली पायरी आहे - प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे..



=====================================
==============================

भिलवडी : वार्ताहर          10 ऑक्टोबर 2023

भिलवडी (ता.पलूस) येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मानसशास्र विभाग व सेकंडरी स्कुल व ज्युनिअर कॉलेज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने " जागतीक मानसिक आरोग्य दिन " विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
   
 यावेळी कार्यकमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे श्री संजय मोरे  मुख्याध्यापक , सेकंडरी स्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज , भिलवडी , डॉ. श्रीकांत चव्हाण, डॉ. एस.डी. कदम उपस्थित होते .


" तणावमुक्त जीवन ही यशाची पहिली पायरी आहे " असे प्रतिपादन यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. देशपांडे यांनी केले.
पुढे बोलताना प्रा.देशपांडे म्हणाले की, शारीरिक रोग बरा करता येतो पण मानसिक रोग ठीक करता येत नाही . त्याला औषध हे फक्त भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्रानी हजारो वर्षे आधी सांगून ठेवले आहे .
ज्याला योग ase म्हणले जाते .
आज जगात मानसिक आजाऱ्हा महत्वाचा आजार होऊन तुम्हा - आम्हावर राज्य करतोय . आपण म्हणतो माझा मूड नाही , मी  बोअर झालो आहे , आज काहीच करावे वाटत नाही , ही बिघडलेल्या मनाची  वा मानसिक आजारी असण्याची लक्षणे आहेत . ताण हा सर्वांकडे असतो , मात्र ताणतणावा शिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही . जास्तीचा ताण उपयोगी नसतो , तणावमुक्त जीवनाचे अनेक फायदे आहेत . तणावमुक्त माणसाला जमिनीवर पडल्या पडल्या गाढ झोप लागते. जगातल्या सर्वात वेगवान विमानापेक्षा  ( सुपर सॉनिक जेट  )  मानवाचं मन ही अधिक वेगवान गोष्ट आहे कारण मन क्षणात इथे तर क्षणात अमेरिकेमध्ये असते . सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तिमत्व देखील दिवसात अनेक वेळा नकारात्मक ( निगेटिव्ह  ) विचार करतात हे मानसिक आजाराणी जग व्यापले आहे याचेच सर्वात मोठेपणा उदाहरणं होय  . अनेक अमेरिकन किंवा पुढारलेल्या देशातील माणसं चैन करतात ,
ऐषारामी जीवन जगतात म्हणून ते सुखी असतात असे म्हणता येणार नाही .
       आज भारतीय प्राचीन वैद्यकीय शास्र आरोग्य , व्यायाम व योगामध्ये मन रमवा असे सांगते. त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन मन हलके व ताजे तवाने होते .
स्वतःचा ईगो (स्व )  दूर ठेवा ,स्वतःवर  प्रेम करा . दररोज कोणतातरी शारीरिक हालचालीचा , चालनवलनाचा खेळ खेळा , मोबाईलवर क्रिकेट वा व्हॉलीबॉल वा फुटबॉल  नको. तरुण मुला मुलींनी  दिवसात 5 ते 6 तास शारीरिक चलन वलन केलेच पाहिजे . स्वतःसाठी वेळ द्या  , पोषक आहार घ्या . व्यसनापासून दूर राहा . उदा . मोबाईलचे व्यसन सोडा .
कायम सकारात्मक विचार करा . दररोज योगासने करा ,  ती जीवनाला योग्य आकार देतात . आपले प्रश्न  , चिंता ह्या आपली पत्नी , मैत्रीण , मित्र आई वडील व गुरूपासून लपवू नका .
आपला अमूल्य वेळ आपल्या कुटुंबासाठी वापरा .
तुम्ही दिवसभर दुसऱ्याबदल वाईट विचार करत नसाल तर तुमचे मानसिक आरोग्य ठीक आहे असे समजा  असे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे म्हणाले .


      या कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री संजय मोरे - मुख्याध्यापक , सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, माणसाचे मन हे चंचल आहे . बहिणाबाईच्या कवितेत त्या म्हणतात - मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर , किती हाकला हाकला , फिर येई पिकावर  , अशा आपल्या मनाची अवस्था आहे , आपले मन चंचल आहे . म्हणून ' मन करा रे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण ' आपले मन निर्मळ असेल तरच सर्व चांगले होईल अन्यथा प्रत्येक गोष्ट आपल्याला वाईटच दिसेल . एकदा एका मुलाला पायात सॉक्स व शूज नाही म्हणून खंत करतो . तो रस्त्याने जाताना दोन्ही पाय नसलेला माणूस पाहून त्याच्या मनातील खंत निघून जाते म्हणून खंत करण्यापेक्षा नेहमी सकारात्मक विचार करा असे श्री मोरे सर म्हणाले . 
       या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीकांत चव्हाण सरानी केले . सूत्रसंचालन सौ . वृषाली जंगम मॅडम यांनी केले तर आभार प्रा. ए.डी. नलावडे , प्रा डी.एन. राजमाने , डॉ. जी . बी . पाटील .
यांनी मानले . या कार्यक्रमास ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆