व्हिडीओ
👇
=====================================
=====================================
सांगली : सांगली येथे जयंत पाटील यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. या टीकेला आज वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा प्रभारी यांनी प्रतिउत्तर दिले. सुर्यवंशी म्हणाले, एक भटजी आहे तो मोदींची सुपारी घेऊन बसला आहे जयंत पाटील जरा बघा आणि या भटजीला मोदींच्या तावडीतून सोडवा. तो भटजी तुमच्या फार जवळचा आहे ते फक्त तुमचच ऐकतात. अजित पवार सोबत जाऊन तुम्ही पहाटेच्या अंधारात भाजपच्या फडवणीस सोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले,
ॲड. प्रकाश आंबेडकर हे निर्भिड नेते आहेत ते आपली भूमिका ठामपणे घेऊ शकतात. ते कुठेही तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसारखे मळकटलेले नाहीत.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदीला हरवायचे असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावेच लागेल. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्ये सतत येत आहेत त्यावरून आम्हाला तुमच्या मानसिकतेवर संशय येत आहे की तुम्हाला भाजपला मोदीला हरवायचे आहे की नाही? तुमची मोदी सोबत छुपी युती आहे का? हे स्पष्ट करा.
मोदीला हरवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी सोबत सन्मानपूर्वक युती करा. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे बंद करा अन्यथा तुमचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆