yuva MAharashtra पलूस तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी

पलूस तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी

               5 नोव्हेंबर ला होणार मतदान



======================================
======================================
                                   VIDEO



पलूस : वार्ताहर                दि. 21 ऑक्टोबर 2023

पलूस तालुक्यातील कुंडल , आमनापूर विठ्ठलवाडी , राडेवाडी या चार गावांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एकंदरीत या चार पैकी कुंडल हे गाव सर्वात मोठे गाव आहे. 18 हजाराहून अधिक मतदान असणारे हे गाव आहे. या गावच्या निवडणुकीकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे . 20 ऑक्टोबर हि निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. गुरुवार दि.19 अखेर प्रत्येक गावातील उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज पुढील प्रमाणे - कुंडल 57 अर्ज सदस्य पदा करीता आणि 3 अर्ज सरपंचपदा करिता दाखल झाले आहेत. आमनापूर चे 19 अर्ज सदस्यपदा करिता 3 अर्ज सरपंचपदा करिता दाखल झाले आहेत तर राडेवाडी चे 10 अर्ज सदस्यपदा करिता आणि 2 सरपंचपदा करिता दाखल झाले आहेत. विठ्ठलवाडी एकही अर्ज दाखल नाही.
पलूस तालुक्यातील कुंडल , आमनापूर विठ्ठलवाडी , राडेवाडी या चार गावांच्या निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार निवास ढाणे लक्ष ठेवून आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆