=====================================
=====================================
सांगली : वार्ताहर दि. 8 ऑक्टोबर 2023
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी शहाजी रमेश कांबळे यांची निवड करण्यात आली. ते पुर्वी शिराळा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्त होते.
त्यांची संघटने मधील उत्कृष्ट कामगिरी व कामाची दखल घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांनी केलेल्या सुचनेनुसार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश सुनील पाटील यांच्या वतीने निवड करण्यात आली.
कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल काम संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल व संघटनेची प्रतिमा उज्वल कराल, असा संघटनेचा ठाम विश्वास आहे.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटना ही पोलीस बंदोबस्त,उत्सवाचा काळ, जनजागृती मोहीम,सामाजिक तंटे सोडवणे व समाजात शांतता राखणे हा मूळ हेतू संघटनेचा आहे.
कांबळे यांचे देववाडीसह इतर शिराळा तालुका, वाळवा तालुका व सांगली जिल्ह्यातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆