========================================
========================================
धाराशिव : उमरगा तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथे शनिवारी रात्री पेट्रोलियम करीत असलेल्या पोलिसांनी हैदराबाद कडून येणाऱ्या टेम्पोला थांबवून चौकशी केली असता टेम्पोमध्ये अवैध रित्या आणलेला ३९ लाख ७६ हजारांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी १० लाख ५० हजारांच्या टेम्पोसह एकूण ५० लाख २६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन उमरगा पोलिसांचे पथक शनिवारी दि.१४रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हैद्राबाद कडून येणाऱ्या टेम्पोची एम एच.२०- ईजी ५३५७ तपासणी केली. यावेळी पोलिसांनी वाहन चालक शेख मुराद शेख लाल वय ३७, रा. मस्जिदजवळ, मु.पो.गेवराई, पैठणरोड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यास वाहनासह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆