yuva MAharashtra जुळेवाडी येथील मागासवर्गीय सरपंचास ग्रामसभेतच गाव गुंडांकडून मारहाण ; डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचा ३० नोव्हेंबर रोजी तासगांव तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा

जुळेवाडी येथील मागासवर्गीय सरपंचास ग्रामसभेतच गाव गुंडांकडून मारहाण ; डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचा ३० नोव्हेंबर रोजी तासगांव तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा



प्रतिक्रिया -------




====================================================================

डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार...

तासगाव : जुळेवाडी तालुका तासगांव जि. सांगली येथे बुधवार दि. २२/११/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता जुळेवाडी ग्रामपंचायत समोर हनुमान मंदीर स्टेजवर जनरल ग्रामसभा घेण्यात आली होती. यावेळी सभेत लक्ष्मी मंदीर ट्रस्ट करणे व त्या अनुषंगाने लागणारे ठराव घेणे हा विषय घेण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने चर्चा सुरु असताना 
एका ग्रामस्थाने माझे पण ट्रस्ट मध्ये नाव घ्या असे मत मांडले.
त्यांच्या या मताला उत्तर देताना सरपंच आवळे म्हणाले की , मागील ऑगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत लक्ष्मी मंदीर विषयी चर्चा झालेली होती त्यावेळी तुम्ही स्वतः हजर होता. बहुमताने ठराव देखील पास झालेला होता त्यावेळी तुम्ही तुमच्या नावाची चर्चा का केली नव्हती असे म्हणताच ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले काही 
ग्रामस्थ व सरपंच आवळे यांच्यामध्ये वाद झाला व क्षणातच या वादाचे रुपांतर हानामारीत झाले.
   सरपंच नितीन आवळे यांना मारहाण होत असताना त्यांची पत्नी भांडणे सोडवणेस गेली असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. 


  या घटनेच्या अनुषंगाने आज तासगाव येथे डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत जुळेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दि. ३०/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा मार्गे तासगांव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात  काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 
या निषेध मोर्चाच्या संदर्भात आज तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
  


  यावेळी डिपीआयचे जमीन झोपडी हक्क अभियान राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे, जिल्हाध्यक्ष प्रशांत आवळे, पश्चिम महाराष्ट्र नेते भास्कर सदाकळे, जिल्हा सल्लागार गोरखनाथ सदाकळे, जिल्हा नेते संदीप काटे यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण पहा -----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Youtube Link
👇

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆