सावंतपुर येथील गरजुंची केली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. 30 नोव्हेंबर 2023
आमदार अरुणअण्णा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शरद आत्मनिर्भर अभियानातून पलूस तालुक्यातील सावंतपुर येथील वृद्ध गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून दृष्टी दिली.
शरद फाउंडेशन चे संस्थापक क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली व भविष्यात पलूस - कडेगाव मतदार संघातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिली.
क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड यांच्या संकल्पनेतून शरद आत्मनिर्भर अभियानातून पलूस - कडेगाव मध्ये गेली वर्षभर सातत्याने गरजूंच्या प्रश्नांसाठी अनेक उपक्रमातून प्रभावी कृती केली जात आहे. यासाठी पलूस कडेगाव मधील सर्व गावामध्ये शरद आत्मनिर्भर अभियान सक्षमपणे काम करीत आहे. यापुढेही अशीच जनतेची सेवा करू अशी ग्वाही धनश्रीताई लाड यांनी यावेळी दिली.
यावेळी गोरख सूर्यवंशी, मोहित यशवंत, विनायक महाडीक, दीपक मदने, राजाराम जाधव, भरत घाडगे, विकी नार्वेकर, संतोष धाईंजे, राहुल जाधव उपस्थित होते.
हे पण पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆