आता एकत्रित प्रयत्नातून कारखान्याचे सरासरी उत्पादन ६० मेट्रिक टनावर न्हेण्याचे उद्दीष्ठ ..... शरद लाड
=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याने ठराविक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्नकरून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ मे.टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याने कारखान्याने उच्चांकी उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या उदय लाड यांच्या शेतावर जाऊन त्यांना प्रोत्साहन दिले व अभिनंदन केले.
कुंडल आणि पंचक्रोशीत क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांनी हरितक्रांती आणली आणि क्रांती साखर कारखाण्याची उभारणी केली. यातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासच डोळ्यापुढे ठेवून आमदार अरुणअण्णा लाड आणि सध्याचे अध्यक्ष शरद लाड नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवत आहेत.
यंदा प्रतिकूल हवामान असतानाही केवळ कारखान्याकडून पुरवलेले तंत्रज्ञान, योग्य सल्ला आणि चिकाटीच्या जोरावर योग्य नियोजन केले. उदय लाड यांनी गतवर्षी आडसाली हंगामात ३ जून रोजी को-८६०३२ या जातीची दीड एकर क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या पायलट योजनेतून ऊस लागण केलेली. लागणीसाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांगरट, रोटर अशी पुर्वमशागत करून, माती परिक्षण केले. जमिनीची सुपिकता वाढणेसाठी लागणीपुर्वी एकरी २ ट्रेलर क्रांती कंपोस्ट व १५ डंपिंग ट्रेलर शेणखताचा वापर केला. हिरवळीचे खत म्हणून, तागाचे पिक घेतले. साडेचार फुटावर सरी काढून, दोन फूट अंतराने एक डोळा लागण केली. लागणीसाठी कारखान्याच्या बेणेमळ्यातील प्रमाणित बेणे, बेणेप्रक्रीया करून वापरले होते.
लागणीपुर्वी एकरी डीएपी २ पोती, पोटॅश १ पोते, युरिया १५ किलो, गंधक १५ किलो व रिजेंट १० किलो बेसल डोस म्हणून वापर केला. बाळभरणी वेळी १२:३२:१६ ची २ पोती, पोटॅश ०१ पोते, कॉम्बी २४ किलो, जैव सेंद्रीय भुसुधारक ४०० किलो, युरिया ५० किलो, अमोनियम सल्फेट ५० किलो असा डोस दिला होता. १० फुटातील ऊसाची संख्या योग्य मिळालेनंतर ३ महिन्यांनी डिएपी १०० किलो, पोटॅश ५० किलो, युरिया ५० किलो, अमोनियम सल्फेट ५० किलो, सागरीका दाणेदार २० किलो, पोल्ट्री २०० किलो, सिंगल रोटर मारून खत माती आड केले त्यानंतर १ महिन्यांनी १०:२६:२६ १०० किलो, पोटॅश ५० किलो, युरिया ५० किलो, गंधक १५ किलो, कॉम्बी २४ किलो, रिजेंट ५ किलो, जैवसेंद्रीय भुसुधारक ४०० किलो, सिलिकॉन १०० किलोचा डोस देऊन रोटरने मोठी भरणी केली. याशिवाय मोठ्या भरणीनंतर ठिबकमधून अमोनियम सल्फेट, पोटॅश, कॅल्शियम नायट्रेट ही विद्राव्य खते १५ दिवसाच्या अंतराने ऊसाच्या १२ महिने वयापर्यंत दिली. उभ्या ऊसातील वाळलेले पाचट २ वेळा काढून सरीमध्ये आच्छादन केले. ऊसाची वाढ नियमित राहणेसाठी अन्नघटक, जिवाणू खते व जैव संजिवकाच्या तब्बल ७ फवारण्या या शेतकऱ्याने घेतल्या.
यंदाच्या हंगामात कारखान्याकडे आजवर गाळपासाठी आलेल्यापैकी विजय जाधव (आसद,१२९मे.टन), विद्युलता देशमुख (शिरगांव, ११८मे.टन), आत्माराम शिंदे (देवराष्ट्रे,१२३मे.टन), अशोक पाटील (राजापूर,१२२मे.टन), जयप्रकाश साळुंखे दुधोंडी, ११९मे.टन), अरूणा लाड (कुंडल,११५मे.टन), शांताराम जमदाडे (कुंभारगांव,१०० मे.टन), केरू लाड (कुंडल,१०५ मे.टन), हणमंत लाड(कुंडल,१०७ मे.टन), अनिल लाड(कुंडल,१०२मे.टन), श्रीमंत लाड (कुंडल,१०० मे.टन), विष्णू पाटील (ढवळी,१००मे.टन) विशाल लाड(कुंडल,१०५ मे.टन), तानाजी लाड (कुंडल,११३ मे.टन) लालासो शिंदे(कुंडल,१०० मे.टन) शिवाजी जाधव (कुंडल,१०० मे.टन) अनिल पाटील (बांबवडे,१२५मे.टन), बाळकृष्ण पवार बांबवडे,१०९ मे.टन), जगन्नाथ पाटील (चिखलगोठण,१०७मे.टन), दत्तात्रय माने (१०७मे.टन), अक्षय कारंडे,आळसंद,१२३मे.टन), प्रकाश चव्हाण (तांदळगांव,१०४मे.टन) अशा अनेक शेतक-यांनी १०० मे.टनाच्यावर एकरी ऊस उत्पादन घेतले आहेत.
मी तसा सरासरी एकरी ७५ ते ८० मे.टनाचा शेतकरी पण क्रांती कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या पायलट योजनेतून एकरी शाश्वत १०० मे.टन या उपक्रमात भाग घेतला व पहिल्याच प्रयत्नात उच्चांकी यश मिळवले...उदय लाड.
क्रांती कारखाना नवनवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत आहे. आता फक्त ठराविक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणेसाठी नाही तर कार्यक्षेत्रातील एकूण सरासरी उत्पादन वाढवणेसाठी पथदर्षक प्रकल्प राबविणार... शरद लाड. अध्यक्ष क्रांती साखर कारखाना.
क्रांतिअग्रणी साखर कारखान्याच्या उच्चांकी एकरी १३१ मे.टन ऊसाचे उत्पादन घेणारे पायलट योजनेतील शेतकरी उदय लाड यांच्या प्लॉटवर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आणि कर्मचारी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆