yuva MAharashtra 'कार्यसम्राट' नेतृत्व ; माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीमती शैलजा चौधरी वाढदिवस अभिष्टचिंतन...

'कार्यसम्राट' नेतृत्व ; माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीमती शैलजा चौधरी वाढदिवस अभिष्टचिंतन...



======================================
======================================

सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत केवळ जिद्द चिकाटी मेहनत व महत्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत बारा बलुतेदार , वाढीव लोक वस्ती चा विस्तार व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या पलूस तालुक्यातील माळवाडी गावचे सरपंचपद भूषविलेल्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान मिळालेल्या श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी यांनी आज माळवाडी नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कोणत्याही प्रसंगात सुख दुःखात धावून येणारा ‘आपला हक्काचा माणूस ‘ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानंतर ते आजही तेवढ्याच कर्तव्य भावनेने जनतेच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. पदावर असो किंवा नसो, त्यांची नाळ सामान्य माणसाशी जुळलेली आहे. पदावर नसलेले नेते जेव्हा जनतेला हवेहवेसे वाटतात तेच नेते सामाजिक नेतृत्व करू शकतात. असेच कार्यकुशल नेतृत्व असलेल्या श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

 कार्यसम्राट श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी यांचा सरपंच ते भिलवडी शिक्षण संस्थेच्या साहा.शिक्षिका एक थक्क करणारा राजकीय , सामाजिक व शैक्षणिक प्रवास.



 श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी या नावाने आज सांगली जिल्ह्यात भल्याभल्यांना दखल घ्यायला लावली. आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर सरपंच पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कतृत्वाने सिद्ध केले. नेतृत्व दातृत्व व कतृत्व या तिन्ही गुणांना मेहनतीची जोड देत समाजकारण व राजकारणाची सांगड घालत आपल्या कार्यकतृत्वाने केवळ माळवाडीतच नव्हे तर पलूस तालुक्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी यांनी निर्माण केली.

सरपंच पदावर असताना घरगाडा चालवत व शैक्षणिक सेवा बजावत आपण केवळ राजकारण करीत नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे देखील विरोधकांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामूळेच राजकारणात विरोधक असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांना चौधरी मँडम बद्दल नेहमीच आदर राहिला आहे.

   मुळापासून नेतृत्वाचे गुण असणाऱ्या चौधरी मँडम यांना राजकीय जिवनात राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ. पतंगराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. गावगाडा चालवित असताना अनेक राजकीय राजकीय संकटांना त्यांना सामोरे जावे लागले.

 स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे. 

सरपंच पदाचा एकूण काळ ७ वर्षे ---

सन १९९५ ते सन २००० पर्यंत -- ५ वर्षे ( काँग्रेस )
सन २०११ व २०१२ पर्यंत -- २ वर्षे ( भाजप ) 

माळवाडी गावच्या महिला सरपंचपदाचा पहिला मान.

भाजप महिला मोर्चाच्या पलूस तालुका खजिनदार.

सरपंच कारकिर्दीतील ठळक कामे ---

पाण्याच्या टाकीचे बांधकाम , भगिरथ योजनेअंतर्गत शिवाजीनगरमध्ये विजेचे खांब बसविणे , बाजार कट्याचे काम , मुलभूत सुविधा , रस्ते , गटारी , आरोग्य सुविधा , स्वच्छता इ.

गावातील विविध धार्मिक मंदिरांच्या उभारणीत सढळ हाताने मदत व योगदान. सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा , शैक्षणिक व राजकीय कार्यक्रमात सहभाग.

 शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी ---



१ ऑक्टोबर १९८५ साली भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू.. जवळपास ३९ वर्षाची प्रदिर्घ सेवा.
आज रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल & ज्युनिअर कॉलेजमध्ये साहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत.


सन २०१५ ला श्रमजीवी परीवारातर्फे आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रत्येक वर्षी ७ गरीब मुलांचा शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलणे ,

प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, संयमी आणि प्रज्ञा प्रतिभा संपन्न गणित विषयतज्ञ शिक्षिका असून त्यांनी आजपर्यंत विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले.

आजच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त शाळेत ४८ पुस्तके भेट...

कुटुंबाची साथ ---

आतापर्यंतच्या या प्रवासात त्यांचे दिवंगत पती ईश्वरा चौधरी ( शिक्षक )
 दोन मुली उषादेवी , वृषाली व एक मुलगा विनायक व सून विशाखा यांची समर्थपणे साथ लाभली.

एक मुलगी पी.एच.डी तर दुसरी डॉक्टर आणि मुलगा माळवाडी गावचा पोलीस पाटील.

सामाजिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना कुंटुंबियांनीही त्यांना यात मागे खेचले नाही उलट आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या कुटुंबीयाने त्यांना समर्थ साथ दिली.

पतीची खंबीर साथ आणि यशाची शिखरे ---



राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास एका महिलेसाठी नक्कीच तारेवरची कसरत करणारा ठरतो, पण जर आपल्या पतीची खंबीर साथ लाभली तर यशाची शिखरे पार करत असताना कसलीच अडचण येत नाही.
 महिला म्हणून सरपंच असताना देखील त्यांच्या पतीनी म्हणजेच ईश्वरा चौधरी सरांनी कधीही ग्रामपंचायत कामकाजात ढवळाढवळ केली नाही की कधी पत्नी सरपंच म्हणून अहंकाराने स्वतः ग्रामपंचायतीची पायरी चढली नाही. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे ही सतत सूचना व त्यासाठी खंबीर साथ देण्याचे कार्य सरांनी व त्यांच्या मित्र परिवाराने केले.आणि त्यामुळेच कधीही, कितीही राजकीय संकटे आली तरीही चौधरी मॅडम स्वतः खंबीरपणे ग्रामपंचायत कार्यालयात नेतृत्व करू शकल्या.आणि त्यामुळेच समाजसेवेतील प्रामाणिकपणा, आपुलकीनं विना द्वेष भावनेने काम करण्याची निष्ठा पाहून या खंबीर महिला नेतृत्वाला गावातील सर्व नागरिकांची व कार्यकर्त्यांची अगदी नवीन पिढीतील छोट्या छोट्या तरुण कार्यकर्त्यांची सुद्धा तेवढीच तोला-मोलाची साथ मिळाली हे महत्वाचे. 

कार्यसम्राट नेतृत्व श्रीमती शैलजा ईश्वरा चौधरी यांचा राजकीय व सामाजिक पटलावरील यशस्वीतेचा आलेख असाच उंचावत राहावा. त्यांच्या हातून जनसेवा घडत रहावी. त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना निरोगी दिर्घायुष्य लाभो. हीच सदिच्छा... 





 माळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कार्यसम्राट श्रीमती शैलजा ईश्वरा यांना " द जनशक्ती न्यूज " परीवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. 

हे पण पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆