भिलवडी : वार्ताहर दि. २९ डिसेंबर २०२३
भिलवडी तालुका पलूस येथील भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान , जिल्हा सत्र न्यायालयातील सेवानिवृत्त क्लार्क व आजी-माजी सैनिक संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष मारुती शामराव यादव यांचे गुरुवार दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
२८ सप्टेंबर १९७६ ते ०१ फेब्रुवारी १९९४ या कालखंडात त्यांनी भारतीय लष्करात हवालदार या पदावर राहून त्यांनी १८ वर्षे सेवा बजावली होती.
सेवानिवृत्ती नंतर सन २००२ मध्ये त्यांची जिल्हा सत्र न्यायालयात क्लार्क या पदावर नियुक्ती झाली. मुंबई , सांगली व इस्लामपूर या ठिकाणी त्यांनी १० वर्षे काम पाहिले व तेथून ते सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले.
ते भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली (विवाहित) असा परीवार आहे.
रक्षा विसर्जन ----
शनिवारी दि. ३० / १२ / २०२३ रोजी
सकाळी ०९ वाजून ३० मिनिटांनी
भिलवडी येथील कृष्णा घाटावर होणार आहे.
आजी माजी सैनिक संघटना भिलवडी यांचे कार्यकारी उपाध्यक्ष हवालदार कै. मारुती शामराव यादव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना.
शोकाकुल - आजी-माजी सैनिक संघटना भिलवडी ता.पलूस जि.सांगली
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆