======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. ३ डिसेंबर २०२३
देशातील महिलाना एस. टी. मधून मोफत प्रवास नसला तरी चालेल पण पूर्व प्राथमिक ते पदवित्तर पर्यंतचे शिक्षण मोफत पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत असायला हवं. असे मत ॲड. वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.
त्या कुंडल(पलूस) येथे क्रांतिअग्रणी डाॕ.जी.डी.बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "क्रांतिअग्रणी व्याख्यानमालेचे" तिसरे पुष्प गुंफताना भारतातील स्त्रिया या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक चेतन पारेख होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, ॲड. प्रकाश लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, व्ही.वाय पाटील, सरपंच जयराज होवाळ प्रमुख उपस्थित होते.
ॲड . वैशाली डोळस म्हणाल्या,
शरीरातील बदल सोडला तर महिला पुरुषांच्या इतक्याच सक्षम आहेत. स्त्री माणूस असून स्वतंत्र व्यक्ती व देशाची नागरिक आहे. त्यांना पुरुषा इतकाच हक्क आहे. तिला जन्मतःच देशाचे नागरिक म्हणून स्वीकारले पाहिजे.
महिलांना स्वातंत्र्य नसते हे सांगणारी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सद्याची व्यवस्था करत आहे.
वैवाहिक जीवन जोडत असतानाही सद्या पदव्यांचे मॅचिंग केले जात आहे. क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा विवाह आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. आमदार अरुण लाड यांनी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचा जो सचित्र इतिहास मांडला आहे तो पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे.
महिलांना माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. जगण्यातील वास्तविकता व दूरचित्रवाणी वरील अभासीपण आपल्याला समजले पाहिजे. आभासी संस्कृतीमुळे जीवन जगणे हरवत चालले आहे.
पुरुषांच्या आशा, आकांक्षा माणूस म्हणून योग्य आहेत हे समाजाने मान्य केले, मात्र महिलांच्या जीवनातील आशा आकांक्षा ब्राम्हणी सत्तेने कधीच समजून घेतल्या नाहीत. उच्चभ्रू घराण्यातील महिलांवर जास्त बंधने घातली जात आहेत.
दरम्यान क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड व क्रांती वीरांगना विजयाताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड, कुंडलिक एडके, प्रा . डॉ. प्रताप लाड, अरुणराव पवार, संदीप पवार, जगन्नाथ आवटे , दिनकर लाड यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
क्रांती अग्रणी व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना ॲड. वैशाली डोळस, व्यासपीठावर चेतन पारेख
हे पण पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆