=====================================
भिलवडी : वार्ताहर
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजी नगर मंगळवेढा या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिले जातात 2022 या वर्षाचे सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्काराचे नुकतेच मंगळवेढा येथे वितरण करण्यात आले सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय बाल साहित्याचा पुरस्कार भिलवडीचे सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहास नुकताच प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर विभागाचे प्रतिनिधी कल्याण शिंदे प्रकाश जडे या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सुभाष कवडे यांनी स्वीकारला.
यावेळी अरुण म्हात्रे म्हणाले बालसाहित्य मुलांचे भाव विश्व समृद्ध करते हिरवी हिरवी झाडे हा सुभाष कवडे यांचा बालकविता संग्रह संस्कारक्षम मनोरंजन करणारा आणि चिमुकल्यांचे भाव विश्व समृद्ध करणारा आहे आज सकस बाल साहित्याची गरज आहे अशावेळी कवडे यांचा हिरवी हिरवी झाडे हा बालकवितांचा संग्रह खूप मोलाचा आहे विभागीय साहित्य संमेलनाच्या प्रसंगी मला महत्त्वाचा वाटतो सुभाष कवडे यांची यापूर्वी गंमत गाणी आणि संस्कार शिदोरी ही पुस्तके बाल वाङ्मयात मोलाची भर घालणारी ठरली आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक प्रदीप पाटील वसंत पाटील मनीषा पाटील प्रतिभा जगदाळे दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे लहू ढगे यांच्यासह राज्यभरातून आलेले साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी सुभाष कवडे यांना शिवाजी विद्यापीठाचा पंडित आवळेकर काव्य पुरस्कार सुधांशु पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार शब्दांकन पुरस्कार नरेंद्र विद्यापीठ पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल श्री सुभाष कवडे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे पुरस्काराचे स्वरूप शाल सन्मानपत्र सन्मान चिन्ह रोख रक्कम व ग्रंथधन असे होते.
हे पण पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆