yuva MAharashtra जो माणूस धडपडतो तो काही तरी साद्य करतो आणि जो माणूस धडपडत नाही तो काहीच साद्य करु शकत नाही ; मा.आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख

जो माणूस धडपडतो तो काही तरी साद्य करतो आणि जो माणूस धडपडत नाही तो काहीच साद्य करु शकत नाही ; मा.आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख







=====================================
=====================================


भिलवडी : पलूस तालुक्यातील माळवाडी येथील सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी संचलित ; सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी , सैनिक पॅटर्न निवासी संकुल , संजय यादव इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स माळवाडी , सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी , आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी , कै. ह. भ. प. सुबराव बापू यादव बाल शिक्षण मंदिर माळवाडी या सर्व शाळांंचा वार्षिक स्नेहसंमेलन 2023/24 अंतर्गत पारितोषिक वितरण समारंभ , डेमो-डे व विविध गुणदर्शन कार्यक्रम रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सन्मान शिक्षण संकुल माळवाडी येथे नुकताच पार पडला.
माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळच्या सत्रातील विविध गुणदर्शन , पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला.

माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते विद्येची देवता श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान संस्थेचे संस्थापक संजय यादव यांच्या दालनात माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख , उपस्थित सर्व मान्यवर , संस्थेचे संस्थापक व संचालक यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत संस्थेचे संस्थापक संजय यादव यांच्याशी संवाद साधत आमदार देशमुख यांनी सन्मान शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेंची व विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.


यावेळी विद्यालयातील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भिलवडी गावचे सुपुत्र सचिन पाटील यांना नुकताच महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांलीचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ व बुके। देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती पलूस , नवनिर्वाचित अध्यक्ष सर्जेराव नलवडे यांच्या सह समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झालेले नवनिर्वाचित सदस्य सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संजय यादव , धनगावचे दिपक भोसले , अंकलखोप च्या सौ.कांचन पाटील , आमणापूरचे आकाराम पाटील ,बुर्लीचे उमेश पाटील , घोगावचे राजीव पाटील यांचा देखील यावेळी सन्मान शिक्षण संस्थेच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
  जो माणूस धडपडतो तो काही तरी साद्य करतो आणि जो माणूस धडपडत नाही तो काहीच साद्य करु शकत नाही. संस्थेचे संस्थापक संजय यादव यांनी स्वतःची नोकरी सांभाळत अत्यंत कष्टातून वाढविलेले हे 'विद्या विकास'च्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करुन या संस्थेच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी व्यक्त केले.
  यावेळी बोलताना उद्योजक सर्जेराव अण्णा नलवडे म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या शिक्षण संस्थेची वाटचाल सुरु आहे. या संस्थेच्या पलूस तालुक्यात अनेक शाखा  आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचे काम संस्थेचे संस्थापक संजय यादव करीत आहेत. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारची मदत करु असे आश्वासन दिले.

या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेंद्र चौगुले , पलूस तालुका भाजपचे अध्यक्ष मिलिंद पाटील , सन्मान शिक्षण संस्थेचे सचिव युवराज (आप्पा) यादव , संचालक बाळासाहेब यादव , हिंदुराव यादव , खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तम जाधव , आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक प्रशांत राठोड , सन्मान पब्लिक स्कूल मुख्याध्यापिका सुजाता औताडे , सन्मान करिअर अकॅडमी विभाग प्रमुख सुरज पाटील , संजय यादव इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुख्याध्यापिका कोमल पाटील यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆