yuva MAharashtra पारधी पुनर्वसनासाठी इस्लामपूरात दलित महासंघाचा मोर्चा

पारधी पुनर्वसनासाठी इस्लामपूरात दलित महासंघाचा मोर्चा

प्रांतधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेले आंदोलक कार्यालयात घुसले

                                  व्हिडीओ
                                            👇




======================================
==============================

इस्लामपूर : वार्ताहर 

इस्लामपूर (ता.१८) : वाळवा व शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
              छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरवात करण्यात आली. कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांचे कडे जुगारून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात घुसवण्यात आला.प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दानाणून सोडण्यात आले पारध्यांचा आक्रोश बघून पोलिसही हतबल झाले होते. प्रांताधिकारी यांच्या अनुपस्थित नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यास आंदोलकांकडून नकार देण्यात आला. परस्थिती आवक्याबाहेर झाल्यानंतर पो. निरीक्षक संजय हारूगडे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर वायदंडे यांनी सर्व पारधी बांधवांना आवाहन करून आंदोलनस्थळी आणले.
   
   यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले,पारधी पुनर्वसनाबाबत काढत असलेल्या मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना कल्पना दिली असतानासुद्धा ते अनुपस्थित राहिले हयाचा आम्ही निषेध करतो.
   
  वाळवा व शिराळा तालुक्यातील पारधी पुनर्वसनाबाबत कोणतेही लेखी आश्वासन देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तरी ठोस अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही तसेच मागण्यांची पूर्तता न झालेस आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
   
    मोर्चात पोपटराव लोंढे, अशोकराव गायकवाड,दिनकर नांगरे,चिरंजीव मोरे,प्रभाकर तांबीरे,नारायण वायदंडे,संभाजी मस्के, गणेश वारे,जितेंद्र काळे,टारझन पवार, इंद्रजित काळे,राकेश काळे,नागेश पवार,घायल काळे, अविशाम भोसले, दिकल पवार, निर्मला पवार, गुलछडी काळे, मालन पवार, उषा चव्हाण, काजल चव्हाण, जहांगीर पवार, कपिल पवार, रणजित पवार, अमोल पवार, मोबाईल पवार, नमिना पवार, मीनाक्षी पवार यांच्यासह शेकडो पारधी बंधू भगिनी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆