=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर
पलूस/कुंडल (दि.14) : ऊस शेतीमध्ये सुधारणा करणेसाठी महिलांचे योगदान मोलाचे असलेचे मत क्रांति अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरूणअण्णा लाड यानी व्यक्त केले.
कारखान्यामार्फत आयोजित महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार लाड म्हणाले, ऊसाचे एकरी उत्पादन वाढावे म्हणून कारखान्याकडून दरवर्षी विविध ऊस विकास योजना राबविल्या जातात. ऊस शेतीतील कामामध्ये पुरूषांपेक्षा महिलांचा अधिक सहभाग असतो. नवीन तंत्रज्ञान समजावे म्हणून मागील दहा वर्षापासून महिलांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात, नवीन गोष्टी जाणून घेतात याचा अभिमान आहे.
यावेळी ऊस तज्ञ सुरेश माने-पाटील यांनी खोडवा व्यवस्थापन या विषयांवर, इफ्कोचे जिल्हा व्यवस्थापक विजय बुनगे यांनी नॅनो रासायनिक खते या विषयांवर व पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एन. पाटील यांनी किफायतशीर दुग्धोत्पादन या विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, संचालक दिलिप थोरबोले, संजय पवार, अशोक विभुते, सुभाष वडेर, संचालिका अंजना सुर्यवंशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे
तसेच परिसरातील बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या. स्वागत-प्रास्ताविक ऊसविकास अधिकारी विलास जाधव यांनी केले तर आभार संचालिका अश्विनी पाटील यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆