yuva MAharashtra क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जयंती निमित्त शरद आत्मनिर्भर मार्फत दुधोंडी येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जयंती निमित्त शरद आत्मनिर्भर मार्फत दुधोंडी येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न



व्हिडीओ 
👇


======================================
======================================

पलूस : वार्ताहर                    दि. ५ डिसेंबर २०२३

क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या 101 व्या जयंती निमित्त बापूंचा सामाजिक लोकसेवेचा वसा आणि वारसा जपणारे 
पुणे पदवीधर आमदार अरुण (अण्णा) लाड यांचे मार्गदर्शनाने शरद फाउंडेशन संचिलित शरद  आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व जिल्हा परिषद गट दुधोंडी यांचे संयुक्त विद्यमाने दुधोंडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करणेत आले होते. शिबिराचे उदघाटन क्रांती अग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. शरद भाऊ लाड यांनी केले.
त्यावेळी त्यांनी पलूस कडेगाव मतदार संघातील नागरिकांना रक्ताची गरज Smart तिथे शरद फाउंडेशन च्या साहाय्याने ती गरज आपण पूर्ण करू तसेच आरोग्या संदर्भामध्ये क्रांती परिवार शरद फाउंडेशन च्या माध्यमातून सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे सांगितले. तसेच शरद फाउंडेशन कुंडल संचलित शरद आत्मनिर्भर आभियान यांचेवतीने पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये रक्तदान शिबीर, तसेच मोफत रक्त पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले जाते. तसेच या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनाचा लाभ दिला जातो यासाठी प्रत्येक जिल्हपरिषद गट निहाय विभागीय संघटक नेमलेले आहेत त्यांच्या साहाय्याने नागरिकांचे रेशन कार्ड काढणे/नाव वाढविणे/ कमी करणे,  संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, बालसंगोपन योजना, अपंग प्रमाणपत्र काढणे अशा विविध शासनाच्या योजना या अभियानाद्वारे राबविल्या जात आहेत याचा पलूस - कडेगाव तालुकेतील सर्व गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शरद (भाऊ) लाड यांनी केले.

क्रांती महिला प्रतिष्टान पलूस - कडेगाव तथा शरद फाउंडेशन च्या अध्यक्षा, सौ. धनश्री लाड (वहिनी) यांच्या संकल्पनेतून शरद आत्मनिर्भर अभियान पलूस - कडेगाव या माध्यमातून सातत्याने रक्तदान शिबीर आयोजित करीत आहे आणि याचबरोबर या शिबिरामध्ये महिलांचा सहभाग कमालीचा दिसून आला. ग्रामीण भागातील महिला स्वयंस्फूर्तीने या शिबिरासाठी रक्तदान करणेसाठी प्रतिसाद देत होत्या.

रक्तदान शिबिरासाठी मानसिंग उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. बापू जाधव, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, दुधोंडीच्या सरपंच सौ. उषा देशमुख,  उपसरपंच विजय जाधव यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी  सुकुमार पाटील संचालक क्रांती कारखाना, विनायक महाडीक कार्याध्यक्ष पलूस तालुका राष्ट्रवादी पार्टी , दीपक मदने उपाध्यक्ष शरद फाउंडेशन कुंडल, भरत घाडगे, जयप्रकाश साळुंखे, पत्रकार तुकाराम धायगुडे श्रीवर्धन पाटील, अमोल पाटील,  इंद्रजीत पवार, सयाजी पाटील,  अरुण शिंदे, मोहित यशवंत, पंकज पाटील, शिवराज शेळके , मोहन धनवडे,  नंदकुमार तिरमारे, संदीप वाघमारे, दिलीप जाधव, विलास जाधव, सतीश जाधव, केसरे आबा, प्रदीप पाटील, बाबासो भोसले, श्रीकांत आरबूने, गणेश मगर - पाटील, अनिल साळुंखे, रवींद्र सनके, अतुल मोहिते, महादेव नायकवडी, प्रमोद जाधव, संदीप चव्हाण, अमोल काशीद,   विकी नार्वेकर, राजू जाधव, रामानंदनगरच्या माजी सरपंच जयश्री मदने, रूपाली कारंडे, शुभांगी कुंभार उपस्थित होत्या.






हे पण पहा ------



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆