yuva MAharashtra कॅन्सरचे मुळ कारण आयुर्वेदात सापडते....

कॅन्सरचे मुळ कारण आयुर्वेदात सापडते....



======================================
======================================


कॅन्सरचे मुळ कारण आयुर्वेदात सापडते.... 

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.

  असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून - अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम सत्य आहेत।।। 

 बाकीच्यांसारखे जर पाच - दहा वर्षाला यांचे Parameter नाहीत बदलत।।। 

मागचं संशोधन खोटं होतं - आताचं खरं आहे।। आता हे फॉलो करा।। असे फसवे अन वारंवारचे वटहुकूमही इथं येत नाहीत।।

आयुर्वेदाच्या या मुलसिद्धांतांना आतापर्यंत कुणीच चॅलेंज नाही करू शकलं, एवढे पक्के आहेत हे सिद्धांत।। 

या सिद्धांताला धरून केलेली आयुर्वेदाची चिकित्सा कधीच फोल जात नाही।।

आयुर्वेदाच्या मुल सिद्धांतांपैकी एक सिद्धांत, जो कॅन्सर या आजाराचे कारण स्पष्ट करतो.....

सामान्य विशेष सिद्धांत...,
सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्| 
ह्रासहेतुर्विशेषश्च, प्रवृत्तिरुभयस्य तु||
- (च. चि. सु. 1/44)

 याचा अर्थ सोप्या भाषेत,

द्रव्य - गुण - कर्म यांनी शरीरभावांशी समानता असलेल्या आहार विहारादीचे आपल्याकडून सेवन झाले तर त्या समान  द्रव्य - गुण - कर्म यांची शरीरभावांमध्ये वाढ होते. 

तसेच जर शरीरभावांच्या द्रव्य - गुण - कर्म यांनी विरुद्ध असलेल्या आहार विहारादीचे  सेवन झाले तर त्या द्रव्य - गुण - कर्म यांचा शरीरभावांमध्ये नाश होतो।।।

उदा. अधिक मांस खाल्लं तर शरीरातील मांस धातूची वाढ होते, तर थंड पदार्थ खाऊन गुणांनी थंड( शीत) असलेला कफ  वाढतो, उष्ण खाऊन उष्ण गुणांचे पित्त वाढते, उष्ण उपचारांनी शित गुणात्मक कफ कमी होतो इत्यादी.

हा सिद्धांत लागू होतो हायब्रीड अन्न धान्याला आणि कॅन्सर व्याधीला...! 

संशोधनातून नुसती उत्पन्नात वाढ होणासाठी बनवलेल्या हायब्रीडीकरणातून अन्न धान्यात नुसती वाढ करवतो ।। ती वाढ प्राकृत (Normal) म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार नसते।।

सामान्य विशेष सिद्धांतानुसार, अशी हायब्रीडीकरणातून विकृत वाढवलेली अन्नधान्य फळे भाज्या खाऊन, तशीच विकृत वाढ करण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरभावात किंवा Cells मध्ये निर्माण होते।। आणि त्या प्रवृत्तीतून झालेल्या विकृत वाढीलाच आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो।।

Uncontrolled, Abnormal and Irregular Growth of any Cells in the Body is called  as CANCER.

ही कॅन्सर ची defination जशीच्या तशी लागू होते शेतात पिकविलेल्या हायब्रीड अन्न धान्याला.....!

हायब्रीड अन्न धान्य म्हनजे ....
Uncontrolled growth - भरघोस उत्पन्न.....! 

एका मक्याच्या ताटाला ४ - ५ कणसे...
देशी बी पेरून चार पोती होत असतील तर हायब्रीड ने चाळीस पोती उत्पन्न होणार....!

Abnormal & Irregular growth ... नैसर्गिक आकार पेक्षा मोठा, वाकडा तिकडा कसाही वाढलेले ...

आजचे बाजारात मिळणारे मोठे हायब्रीड पेरू बघा लक्षात येईल....

देशी टोमॅटो खेळण्यातल्या गोट्यां एवढी छोटी आणि एकदम गोल असतात ..

हायब्रीड टोमॅटो त्यामानाने चांगलीच मोठी आणि चपटी लंबू - वेगवेगळ्या आकारात वाढलेली असतात.


देशी वाणाचे पीक हे पुर्ण वाढ झाल्यानंतर फळ धारणा करते ... तर हायब्रीड वान पिकाची पूर्ण वाढ होण्या आधीच फळ धारणा करतात .....

नर्सरीतून आंब्याचे कलम रोप आणतानाच त्याला मोहोर धरलेला असतो .... 

देशी शेंगदाणा 8 महिन्याचे पीक आहे तर घुंगरी शेंगदाणा पाचव्या महिन्यात काढायला येतो.......!

हायब्रीड अन्न धान्याच्या सगळे गुण जुळतात कॅन्सरशी .....! 

तेच आहे Cancer होण्याचे खरं कारण..!!! असे आयुर्वेदाचा मुळ सिद्धांत स्पष्टपणे सांगतोय.

प्लास्टिक - तंबाखू - गुटखा - दारु आदी कारणं शरिरातील पेशींना Irritating करून Cancerous Growth ला प्रवृत्त करणारी - मदत करणारी आहेत। 

कॅन्सरच मुळ कारण तर हायब्रीड अन्न धान्यच आहे।।। । 

लोकहो जागरूक व्ह्या..... देशी वाण जपा... पिकावयाल चालू करा... अन् खाणाऱ्यानी योग्य मोल देऊन खरेदी करायला शिका....!

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆