=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर
कुंडल (दि.१४) : कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ , अंमलबजावणीबाबत व महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची प्रचारप्रसिद्धधी कार्यक्रम क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल ता.पलूस येथील गाडी तळावरती साखर शाळा येथे बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी पार पडला.
या कार्यक्रमास श्रीम. अश्विनी दळवी संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग, पलूस, हौसाराव साठे समुपदेशक इस्लामपूर, अभय केंद्र पलूस कार्यालयाचे सहाय्यक व बहुउदेशीय कर्मचारी , क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल येथील समन्वयक श्री. संजय जाधव, बड़े मॅडम व वाहन तळावरील उसतोड कामगार व महिला उपस्थित होत्या.
महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी अश्विनी दळवी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे, म्हणून कायदा आल्याचे त्यांनी समजावून सांगितले.
तसेच हा कायदा नेमका काय आहे? लैंगिक छळ कशाला म्हणतात? त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? तक्रार कुणाकडे करायची असते तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कायदा, बालसंगोपन योजना, समुपदेशन केंद्र, स्वाधार गृह, इ. विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली.
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबध्द असून महिलांनी त्यांच्यावर होणा-या अत्याचाराविरोधात वेळीच समितीकडे दाद मागावी व सदर कायद्याबाबत महिलांनी जागरुक राहावे, असे आवाहन यावेळी अश्विनी दळवी यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.
हेही पहा ------सिध्दीविनायक नाष्टा सेंटर - भिलवडीप्रो.प्रा. पिनु खराडेमो.नं. 9730987981
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆