=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. २५ डिसेंबर २०२३
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शेतकऱ्याची मुलगी एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम आली.
शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी एम पी एस सी परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावून गावचे नाव अभिमानाने उंचावले आहे. घरी शैक्षणिक वारसा नसतानाही घरच्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करत केवळ जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद तर आहेच त्याचबरोबर तिने गावखेड्यातील विद्यार्थ्यांसमोर एक मोठा आणि चांगला आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी , सद्स्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाल , श्रीफळ व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, उपाध्यक्ष कयूम पठाण , मुबारक पठाण, संतोष मगदूम ,सलीम मुल्ला, रामचंद्र पाटील, सुनील चौगुले, जितेंद्र मराठे ,गायकवाड मेजर, सुरज हनुमंत यादव यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत कयूम पठाण यांनी केले तर उत्तम गोविंद कांबळे यांनी आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆