yuva MAharashtra 2024 मध्ये स्वत:ला कसं बदलायचं ....

2024 मध्ये स्वत:ला कसं बदलायचं ....

             2023 आता संपला आहे ,

====================================
====================================


2024 नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा...!

जर तुम्हाला वाटत असेल की 2024 आल्यावर सगळं बदलेल तर तस काही होणार नाही आहे ते सगळे तुमचे गैरसमज आहेत
परिस्तिथी तीच राहणार आहे, problems, दुःख, tensions तेच राहणार आहेत, कारण वर्ष बदलून काही होत नसतं त्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलले पाहिजे, मग ते तुमचे विचार, स्वभाव, दृष्टीकोन, निर्णय, सवयी काहीही असो जेव्हा हे सगळं बदलेल तेव्हा तुमचं भविष्य बदलेल अस आपोआप काही बदलत नाही.

2024 मध्ये स्वत:ला कसं बदलायचं

पहिली गोष्ट लोकांचं ऐकणं बंद करा, कोणी काहीही बोलण्याने तुमच्या life मध्ये काही फरक नाही पडणार आहे, म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते महत्वाचं आहे.

Reality Accept करायला शिका, जे काही चुकीच, वाईट झालं असेल ते मान्य करा जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी,
काही गोष्टी आपल्याला नाही आवडणार पण ते खरं असतं त्याला ignore करून काही होणार नाही, सोपं नसेल पण खरं नेहमी खरच रहात तुम्हाला आवडो किंवा न आवडो.

तुमचा Mindset योग्य ठेवा, हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला, तुमचे विचार, दृष्टीकोन बदलावे लागतील. यावर्षी जे झालं ते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा.

Positive videos बघा, तशा लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजतं की ते कसे विचार करतात ते.

मेहनत घ्या. यावर्षी जमलं, नाही जमलं ,जाऊ दे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार, practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही, चूका होतील, पडाल, चालेल शेवटी काय असतं, पडल्याशिवाय माणूस शिकत नाही.

नाती जपा
यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत, कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक आधार म्हणून.
माणसं कधी बदलत नाहीत, त्यांची परिस्तिथी त्यांना तसं करायला भाग पडते, म्हणून गैरसमज दूर करून एकत्र या. नवीन नाती जोडा पण जुनी विसरू नका.

Enjoy करा.
सगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तसच दुःखी रहाणार आहात का, प्रत्येक दिवस आनंदाने जगा, प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही .

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

निसर्ग उपचार तज्ञ*
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆